वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो लाँच होऊन २४ तास उलटत नाही तोच वनप्लसची प्रतिस्पर्धी कंपनी शाओमीनं आपल्या नव्या फोनची घोषणा केली . हा फोन वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रोला टक्कर देणार असल्याचं सूचक ट्विट कंपनीनं केलं आहे.
शाओमी हा सध्याचा भारतातील सर्वाधिक पसंती लाभलेला ब्रँड आहे. स्वस्तात मस्त स्मार्टफोन उपलब्ध करून देणाऱ्या शाओमीनं भारतीय मोबाइल बाजारपेठेवर आपला जम बसवला आहे. वनप्लस देखील भारतातील लोकप्रिय कंपनीपैकी एक आहे. या कंपनीचे फोन ग्राहकांना आवडले. या कंपनीनं १४ मेला बहुप्रतिक्षित असे वनप्लस ७ आणि वनप्लस प्रो हे फोन लाँच केले. लाँचिग झाल्यानंतर अल्पावधितच शाओमीनं वनप्लसला शुभेच्छा देत आपल्या नव्या फोनची घोषणा केली. हा फोन Redmi K20 असणार आहे. किलर सीरिजमधला हा फोन असून यात क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर असणार आहे. त्याचप्रमाणे ४८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला एक वेगळा स्मार्टफोन लवकरच येणार असल्याचं कंपनीचे कार्यकारी अधिकारी मनु कुमार जैन यांनी सांगितलं. यामध्ये ४८ मेगापिक्सेलसह ८ आणि १३ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरा असणार आहेत. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे.
Congratulations @OnePlus team! 👏 There's a new flagship in town.
— Manu Kumar Jain (@manukumarjain) May 15, 2019
Flagship Killer 2.0: coming soon.. Hold my dragon! 🐲 pic.twitter.com/wnqaLbUTSw
'रेडमी K20' या फोनमध्ये डिस्प्लेमध्येच फिंगरप्रिंट सेंसर आणि सुपर वाइड अॅंगल कॅमेरा असणार आहे. त्याशिवाय, स्मार्टफोनमध्ये ६.३९ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असणार आहे. Redmi K20 हा भारतात कदाचित Poco F2 या नावानंही लाँच होऊ शकतो.