पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाओमीचा Redmi K20 लवकरच होणार लाँच

शाओमी

शाओमीनं आपला रेडमी ७s फोन लाँच करून एक दिवसही उलटत नाही तोच कंपनीनं Redmi K20 फोन बाजारात आणण्याचा विचार केला आहे. हा फोन पुढील आठवड्यात चीनमध्ये लाँच होत आहे. त्याचबरोबर हा फोन भारतातही लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे. 

 हा फोन लाँच झाला तर ४८ मेगापिक्सेल असलेला  हा  शाओमीचा तिसरा फोन ठरणार आहे. सोमवारीच शाओमीनं आपला शाओमी रेडमी ७ एस फोन लाँच  केला.  शाओमीनं आपल्या  अधिकृत अकाऊंटवरून नव्या फोनची घोषणा केली आहे. हा फोन रेडमी X च्या जवळपास जाणारा असल्याचं म्हटलं जात आहे.  रिपोर्टनुसार या फोनमध्ये ४८, ८ आणि १३  मेगापिक्सेल कॅमेरा असणार  आहेत. तर या फोनमध्ये ६.३९ इंचाचा डिस्प्लेदेखील असणार आहे. 

शिओमीच्या व्यवस्थापकानं दिलेल्या माहितीनुसार हा फोन Snapdragon 855 प्रोसेसर असलेला सर्वात स्वस्त फोन असणार आहे. Redmi K20 हा फोन भारतात Poco F2 म्हणून लाँच केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. शाओमीनं रेडमी  नोट ७S फोन दोन व्हेरिएंटमध्ये  लाँच केला. या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आणि १२, ९९९ रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.