पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सवलतीच्या काळात एका सेकंदाला शाओमीच्या १० हँडसेटची विक्री

शाओमी

कमी किंमत आणि सर्वाधिक फीचर्स यामुळे अल्पावधीत भारतात लोकप्रिय ठरलेलेल्या शाओमीच्या हँडसेटच्या विक्रीत कमालीची वाढ झाली आहे.  सध्या अनेक ई कॉमर्स साईटवर घसघशीत सवलत शाओमीच्या फोनवर देण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच ग्राहकांचा ओढा खरेदीकडे वाढला आहे. 

 शाओमीची अधिकृत वेबसाई mi. com, फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवर मोठ्या प्रमाणात फोनची खरेदी होत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. येथे सवलतीच्या काळात प्रती सेकंदाला १० हँडसेटची विक्री होत असल्याचं  कंपनीनं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. आतापर्यंत सेलमुळे शाओमीच्या १५ लाख हँडसेटची विक्री झाल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

सॅमसंगचा ‘Galaxy Fold’ भारतातला सर्वाधिक महागडा स्मार्टफोन

कंपनीनं काही बजेट स्मार्टफोन लाँच केले आहेत त्यांची किंमत साडेसहा हजारांपासून सुरू आहे. विशेषत: सणासुदीच्या काळात मोबाइल खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत चालला आहे. 

२०१९ या वर्षांत शाओमी कंपनीनं सर्वाधिक ऑनलाइन मार्केटवर आपला जम बसवला आहे. ४६ % ऑनलाइन मोबाइल खरेदीचं जाळं हे शाओमी कंपनीनं व्यापलं असल्याचं काऊंटरपॉईंडट मार्केट मॉनिटरच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. शाओमीच्या ऑनलाइन खपात  Redmi Note 7 Pro, Redmi 6A आणि Redmi Note 6 Pro या तीन मोबाइलचा समावेश सर्वाधिक आहे. नव्यानं लाँच होणारे फोन्स त्यावर दिल्या जाणाऱ्या आकर्षक सवलतींमुळे ऑनलाइन खरेदीचं प्रमाण वाढलं आहे. 

OnePlus 7T आणि OnePlus TV भारतात लॉन्च; किमती आणि फीचर्स जाणून घ्या

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Xiaomi said it sold more than 1 million devices across all online platforms during the festival sale