पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Xiaomi Redmi K20 आणि K20 Pro यादिवशी होणार भारतात लाँच

शाओमी

आपल्या किलर लूकनं भारतीय ग्राहकांना भुरळ पाडणारा शाओमीचा  Redmi K20 आणि Redmi K20 Pro  हे दोन फोन भारतात कधी लाँच होतात या प्रतिक्षेत ग्राहक आहेत. ‘Flagship Killer 2.0’ अंतर्गत  हे दोन्ही फोन गेल्याच आठवड्यात चीनमध्ये लाँच झाले. वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो लाँच झाल्यानंतर शाओमीनं  दुसऱ्याच दिवशी या दोन्ही फोनची घोषणा केली  होती. त्यामुळे हे फोन वनप्लसला टक्कर देणारे मानले जात आहेत. हे फोन भारतात ठिक सहा आठवड्यानंतर लाँच होतील अशी माहिती कंपनीनं दिली आहे.  

किंमत
चीनमध्ये या फोनच्या विविध व्हेरिएन्टची किंमत ही साधारण  २० हजार ते  ३० हजारांच्या घरात आहे. 
फीचर्स 
Xiaomi Redmi K20 Pro मध्ये  ६.३९ इंचाचा अॅमोलेड एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये पॉप सेल्फी कॅमेरा, फिंगरप्रिन्ट सेन्सॉर आहे. तसेच या फोनमध्ये ४८ मेगापिक्सेल, ८ मेगापिक्सेल  आणि १३ मेगापिक्सेल कॅमेरा असणार आहेत. तर २० मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही यात आहे. 

स्वस्तात मस्त! १५ हजारात उपलब्ध होणारे स्मार्टफोन

शाओमीचे सर्व स्मार्टफोन हे बजेटफोन असल्यानं भारतीय ग्राहकांचा यो फोनला तुफान प्रतिसाद लाभला. शिओमीनं काही दिवसांपूर्वी या फोनचा  फर्स्ट लूक ग्राहकांसमोर आणला होता. या फोनच्या फर्स्ट लूकवर सर्वच जण फिदा झाले होते.