पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Xiaomi Redmi Note 7S लाँच, जाणून घ्या किंमत

शाओमी रेडमी नोट ७S

शाओमी कंपनीचा रेडमी  नोट ७S फोन लाँच करण्यात आला. ४८ मेगापिक्सेल असलेला हा शाओमी कंपनीचा  दुसरा स्मार्टफोन आहे. गेल्या आठवड्यात वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो हा फोन लाँच झाल्यानंतर रेडमी  नोट ७S ची घोषणा करण्यात आली होती. 
फीचर्स 
- ६.३ इंचाचा डिस्प्ले, गोरिला ग्लास
-  ६६० क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर 
- ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, ५ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा 
- १३ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
- फिंगर प्रिन्ट सेन्सॉर
- फेस अनलॉक
- ड्युअल सिम स्लॉट 

किंमत 
3GB+ ३२GB - १० हजार ९९९ रुपये 
४GB+ ६४GB- १२ हजार ९९९ रुपये  
हा फोन तीन रंगात उपलब्ध होणार आहे. २३ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून Mi.com, Flipkart आणि Mi Homes वर हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर २४ मेपासून हा फोन ऑफलाइन उपलब्ध होणार आहे. 

शाओमीनं लाँच केलेला Xiaomi Redmi Note 7S हा रेडमी नोट ७ प्रो स्मार्टफोनचं पुढचं  मॉडेल असणार आहे. स्वस्तात मस्त स्मार्टफोन पुरवणारी कंपनी म्हणून शाओमी भारतीय ग्राहकांमध्ये  प्रसिद्ध आहे.  फेब्रुवारी महिन्यात कंपनीनं लाँच केलेल्या रेडमी नोट ७ प्रोला  भारतात चांगला प्रतिसाद लाभला.  रेडमी नोट ७ प्रोचे २० लाख हँडसेट विकले गेले तेव्हा Xiaomi Redmi Note 7S तेवढाच प्रतिसाद मिळतो का  हे पाहण्यासारखं ठरेन.