पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Xiaomi Redmi Note 7S या आठवड्यात भारतात होणार लाँच

शाओमी

काही महिन्यांपूर्वी शाओमी कंपनीनं  Redmi Note 7 Pro  फोन लाँच  केला होता. या फोनला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद लाभला. केवळ  दोन महिन्यांत या  फोनच्या २० लाख हँडसेटची विक्री झाली. आता  कंपनी Redmi Note 7S लाँच करणार आहे. वनप्लसनं १४ मेला आपला वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो हे दोन फोन लाँच केले.  त्यानंतर लगेचचं शाओमीनं आपल्या नव्या फोनची घोषणा केली. हा फोन याच आठवड्यात  लाँच होत आहे.

OnePlus 7 Pro, OnePlus 7 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सध्या शाओमीचा  Redmi Note 7 Pro हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.  आता  या फोनची  पुढची आवृत्ती  Redmi Note 7S ही असेन. पुढील ४ दिवसांत हा फोन लाँच होणार आहे मात्र शाओमीनं या फोनच्या फीचर्सबद्दल माहिती गुलदस्त्यात ठेवणं पसंत केलं आहे. Redmi Note 7 Pro  ला भारतीय ग्राहकांची खूप पसंती  लाभली . या फोनमध्ये ४८ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला  होता. लवकरच लाँच होणाऱ्या Redmi Note 7S मध्येही  ४८ मेगापिक्सेल  कॅमेरासह आणखी काही भन्नाट फीचर्स असणार आहे. 

या फोनबद्दल शाओमीचे  ग्राहक खूपच उत्सुक आहेत.  स्वस्तात मस्त स्मार्टफोन  देणारी कंपनी म्हणून शाओमी भारतीय  ग्राहकांमध्ये प्रसिद्ध आहे. हा फोन वनप्लसनं लाँच केलेल्या वनप्लस ७ आणि वनप्लस ७ प्रो टक्कर देणारा ठरू शकतो. २० मेला  या फोनवरून पडदा उठणार आहे.