पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Xiaomi Redmi Note 7S : ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, शाओमीच्या नव्या फोनचं फीचर लीक

शाओमी

वनप्लसला टक्कर देण्यासाठी शाओमी  कंपनी  ४८ मेगापिक्सेल असलेला आपला नवा आणि तुलनेनं कमी किमतीचा स्मार्टफोन आणत आहे. हा  स्मार्टफोन शाओमी रेडमी नोट ७ एस असणार आहे. नुकतीच या फोनची घोषणा करण्यात आली.  येत्या २० मे रोजी हा फोन लाँच होत आहे. या फोनचे फीचर  कंपनीनं सध्या गुलदस्त्यात ठेवणं पसंत केलं आहे मात्र याचे दोन फीचर लीक झाले आहेत. 

 कंपनीचे अध्यक्ष मनू कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून  बहुचर्चीत अशा Redmi Note 7S ची झलक युजर्सनां दाखवली आहे. या फोनमध्ये ४८ मेगा पिक्सेलचा कॅमेरा असेन या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.  त्याचप्राणे  गोरिला ग्लॅस  आणि पाच बॅक पॅनल असतील असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे. 

शाओमीनं फेब्रुवारीमध्ये  शाओमी रेडमी ७ प्रो फोन लाँच केला. ७ एस ही त्याची पुढची आवृत्ती असणार आहे. शाओमी रेडमी ७ प्रोची किंमत ही १३,९९९ पासून सुरू होते. नवीन लाँच होणारा फोन देखील ग्राहकांना  परवडणाऱ्या दरात असल्याचं म्हटलं जात आहे. शाओमी रेडमी ७ प्रोच्या दोन महिन्यात २० लाख हँडसेटची विक्री झाली होती. आता शाओमीच्या चाहत्यांसाठी आगामी  फोन हा नवी भेट असणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.