पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वनप्लसला टक्कर देण्यासाठी या दिवशी लाँच होतोय शाओमीचा K20 Pro

शाओमी

वनप्लसला टक्कर देण्यासाठी शाओमीचा K20 Pro आणि K20 हा फोन येतोय. हा फोन चीनमध्ये काही दिवसांपूर्वीच लाँच झाला. आता हा फोन भारतात कधी लाँच होतोय याची उत्सुकता शाओमीच्या चाहत्यांना होती. अखेर हे दोन्ही फोन लाँच करण्याचा मुहूर्त ठरला असून हे दोन्ही फोन १७ जुलैला लाँच होत आहेत. 

या फोननं यापूर्वीच आपल्या लूकचं सर्वांचं लक्ष वेधलं होतं.  फोनचा हटके रंग चर्चेचा विषय ठरला होता. हा फोन काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या  वनप्लसला टक्कर देणारा ठरेन असं खुल्ल आवाहान करत कंपनीनं जाहीरातबाजी केली होती. 

 ४८ मेगापिक्लेस कॅमेरा असलेला हा शाओमीचा तिसरा फोन असणार आहे. रिपोर्टनुसार या K20 Pro  फोनमध्ये ४८, ८ आणि १३  मेगापिक्सेल कॅमेरा असणार  आहेत. तर २० मेगापिक्सेल सेल्फी  कॅमेराही  या फोनमध्ये असणार आहे.  Redmi K20 या फोनमध्ये ६.३९ इंचाचा डिस्प्लेदेखील असणार आहे. 

चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या फोनच्या विविध व्हेरिएंटची किंमत ही २५ ते ३० हजारांच्या दरम्यान आहे. या फोनची भारतात किंमत किती असणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.