पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Redmi K20 च्या 'किलर' लुकवर सर्वच फिदा

Redmi K20

शाओमीचा  Redmi K20  फोन पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. हा फोन नुकताच लाँच झालेल्या वनप्लसला टक्कर देणारा ठरणार हे नक्की. या फोनची जाहिरात कंपनीने हटके पद्धतीनं  केली होती त्यामुळे हा फोन नक्की कसा असेल याची उत्सुकता चाहत्यांना होती. या फोनचा फर्स्ट  लूक लाँच करण्यात आला असून  ग्राहक या  फोनवर फिदा झाले आहे.

‘Flagship Killer 2.0’ अंतर्गत  लाँच करण्यात येणाऱ्या या फोनचं  डिझाइन,  बॅक पॅनल, रंग  सारं काही काही 'किलर'च असल्याचं  कौतुक ग्राहकांनी केलं. ४८ मेगापिक्लेस कॅमेरा असलेला हा शाओमीचा तिसरा फोन असणार आहे. रिपोर्टनुसार या फोनमध्ये ४८, ८ आणि १३  मेगापिक्सेल कॅमेरा असणार  आहेत. तर २० मेगापिक्सेल सेल्फी  कॅमेराही  या फोनमध्ये असणार आहे.  Redmi K20 या फोनमध्ये ६.३९ इंचाचा डिस्प्लेदेखील असणार आहे. 

शिओमीच्या व्यवस्थापकानं दिलेल्या माहितीनुसार हा फोन Snapdragon ८५५ प्रोसेसर असलेला सर्वात स्वस्त फोन असणार आहे. Redmi K20 हा फोन भारतात Poco F2 म्हणून लाँच केला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.