शाओमी कंपनी भारतात आपल्या 'स्मार्ट लिव्हिंग' अंतर्गत सर्वात स्वस्त असे स्मार्टबँड लाँच करणार आहे. हे स्मार्टबँड भारतात १७ सप्टेंबरला लाँच होणं अपेक्षित आहे. त्याआधी शाओमीच्या एमआय बँड ४ च्या भारतातल्या किमती लीक झाल्या आहेत.
४० हजारांहून अधिक किंमत असलेल्या 'अॅपल वॉच'मध्ये नेमकं आहे तरी काय?
कंपनी अॅमोलेड डिस्प्ले असलेला स्मार्टबँड लाँच करणार आहे ज्याची किंमत २ हजार ४९९ रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. ही किंमत कदाचित आणखी कमी होण्याची शक्यता आहे. स्मार्टबँडची वाढती क्रेझ पाहता शाओमीनं भारतीय ग्राहकांसाठी परवडणाऱ्या दरात हे स्मार्टबँड लाँच केले आहेत. यापूर्वी हे बँड चीनमध्ये लाँच करण्यात आले होते.
अॅपल आयपॅडची किंमत २९, ९९० पासून सुरू
२०१८ मध्ये कंपनीनं लाँच केलेल्या एम आय बँड ३ ला भारतीय ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीनं त्याचं पुढचं व्हर्जन लाँच करण्याचा निर्णय घेतला. या फिटनेस बँडमध्ये आरोग्याशी निगडीत अनेक फीचर्स असण्याची शक्यता आहे.