पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाओमीनं परवडणाऱ्या दरात भारतात लाँच केले फिटनेस बँड

शाओमीचे बँड

शाओमीनं भारतात आपले नवे फिटनेस बँड लाँच केले आहेत.  फिटनेट बँडची  क्रेझ भारतात  वाढत चालली आहे. विशेष म्हणजे भारतीय ग्राहकांमध्ये फिटनेस बँडला मोठी मागणी आहे. भारतीय ग्राहकांसाठी शाओमीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्री ऑर्डरची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे फिटनेस बँड परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. 

टिक-टॉकवर करता येणार खरेदी-विक्री

शाओमीनं Mi Band 3, Mi Band 3i  आणि Mi Band 4 हे तीन फिटनेट बँड लाँच केले आहेत. या बँडमध्ये अॅमोलेड डिस्प्ले आहे. यात  युजर्स नोटीफिकेशन पाहू शकतात.  वॉटर रेझिसटन्स, वायब्रेटींग अलार्म, स्लिप मॉनीटर, इव्हेंट रिमांयडर, अॅक्टीव्हीटी ट्रॅकर यांसारखे फिचरही यात देण्यात आले आहेत. तर Mi Band 4 मध्ये लहान होम बटनही देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे म्युझिक प्लेबॅक वॉल्युम कंट्रोलसारखे फिचरही यात आहेत. 

..म्हणून इन्स्टाग्राम एकूण ‘likes’चा आकडाच टाकणार काढून

किंमत 
Mi Band 3i - १, २९९ रुपये 
Mi Band 3 - १, ७९९ रुपये 
Mi Band 4 - २, २९९ रुपये