पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाओमीनं लाँच केला ४ लाख ८० हजार किमतीचा फोन

रेडमी के२० प्रो

भारतात सध्या स्मार्टफोनमध्ये अग्रस्थानी असलेल्या शाओमी कंपनीनं आपला बहुप्रतिक्षीत असा Redmi K20 आणि  Redmi K20 Pro  फोन लाँच केला. हा फोन काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आलेल्या oneplus 7 आणि oneplus 7 Pro ला टक्कर देणारा आहे. या फोनबरोबरच कंपनीनं ४ लाख ८० हजार किमतीचा लिमिटेड एडिशन Redmi K20 Pro फोनही लाँच केला आहे.

शाओमी कंपनी आपल्या बजेट स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. या कंपनीचे फोन हे स्वस्त असल्यानं भारतीय ग्राहकांचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे. मात्र कंपनीनं लाँच केलेल्या लिमिटेड एडिशन  फोनची  किंमत ही  ४ लाख ८० हजार का आहे असा प्रश्न ग्राहकांनाही पडला असेन. यामागचं प्रमुख कारण म्हणजे या फोनची संपूर्ण बॉडी ही सोन्यापासून तयार केली आहे. तसेच या फोनच्या सजावटीसाठी हिरेही वापरण्यात आले आहेत त्यामुळे या फोनची मेकिंग कॉस्ट ही ४ लाख ८० हजार  आहे. 

शाओमीनं केवळ २०  हँडसेट लाँच केले आहेत. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, १३ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड कॅमेरा, ८ मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आणि २० मेगापिक्सेल पॉप  अप सेल्फी कॅमेरा आहे.