चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी ही सध्या भारतीय बाजारपेठेत वर्चस्व गाजवत आहेत. गेल्या पाच वर्षांत १० कोटी हँडसेटची विक्री भारतात झाली असल्याची आकडेवारी कंपनीनं नुकतीच जाहीर केली.
सर्वसामान्यांच्या बटेजमध्ये बसणारी किंमत हे शाओमीच्या भारतातील यशाचं कारण समजलं जातं. कमी किमतीत अनेक फीचर्स या कंपनीनं ग्राहकांना दिले आहेत त्यामुळे भारतीय ग्राहकांमध्ये शाओमीच्या फोनची लोकप्रियता अधिक आहे.
Reliance Jio Giga Fiber लाँच: जाणून घ्या टीव्ही, प्लॅन आणि ऑफरची माहिती
आमच्या आधी अनेक कंपन्या भारतात आल्या. पण अल्पावधित आमच्या इतकं यश क्वचितच एखाद्या कंपनीनं मिळवलं असेन. भारतातल्या कोट्यवधी ग्राहकांकडून आम्हाला प्रेम मिळालं. ग्राहकांनी कंपनीवर विश्वास दाखवला यासाठी मी नेहमीच ऋणी आहे अशा शब्दात शाओमी इंडियाचे उपाध्यक्ष मनू कुमार जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
२०१४ पासून कंपनीच्या १० कोटी हँडसेटची विक्री झाली आहे. ही आकडेवारी २०१४ ते जुलै २०१९ पर्यंतची आहे. कंपनीनं Q3 हा सर्वात पहिला फोन लाँच केला होता. कंपनीनं आतापर्यंत लाँच केलेल्या फोनमध्ये Redmi A आणि Redmi Note series सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. सध्या या कंपनीच्या Redmi 6A आणि Redmi Note 7 Pro या दोन हँडसेटची सर्वाधिक विक्री होत आहे.