पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

World Photography Day 2019 : हे आहेत उत्तम कॅमेरा फोन

कॅमेरा फोन

दरवर्षी १९ ऑगस्ट हा दिवस 'वर्ल्ड फोटोग्राफी डे' म्हणून साजरा केला जातो. शब्दांइतकीच अधिक ताकद ही छायाचित्रात असते. जे १०० शब्दांतही व्यक्त करता येत नाही ते केवळ एका छायाचित्रातून व्यक्त होतं. हल्ली फोटोग्राफीची व्याख्या बदलली आहे, उत्तम फोटोसाठी डिएसएलआर हवेच ही अट आता मागे राहली आहे. मोबाइल फोटोग्राफी ही संकल्पना हळूहळू रुजू होत चालली आहे. अनेक मोबाइल कंपन्या उत्तम कॅमेरा असलेले मोबाइल फोन ग्राहकांना उपलब्ध करून देत आहेत. हे फोन कोणते ते पाहू. 

अल्पवयीन मुलांच्या अकाऊंटवर व्हॉट्स अ‍ॅप लावणार लगाम

Huawei P30 Pro
हा फोन फोटग्रोफीसाठी प्रसिद्ध आहे. या फोनमध्ये 50x झूम आहे. इतकंच नाही या तर या फोनमधून तुम्ही चंद्राचेही चांगले फोटो टिपू शकता. या फोनमध्ये ४ रिअर कॅमेरा आहेत. यात २० मेगापिक्सेल, ४० मेगा पिक्सेल, ८ मेगापिक्सेलचा समावेश आहे. या फोनची किंमत जवळपास ७१, ९९० रुपये आहे. 

Google Pixel 3 XL
उत्तम फोटोसाठी हा फोन ओळखला जातो. डिएसएलआरमधले अनेक फीचर या फोनमध्ये आहेत. या फोनची किंमत जवळपास ५२, ४०० रुपये आहे. 

Xiaomi Redmi K20 Pro
कंपनीनं हा फोन नुकताच लाँच केला. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या फोनची  किंमत ही जवळपास २७, ९९९ रुपयांपासून सुरू होत आहे. 

वनप्लस ७ टी प्रो येणार? फोटो लीक

Realme X
या फोनमध्येही ४८ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या फोनची किंमत ही १६,९९९ रुपयांपासून सुरू होत आहे.

Redmi Note 7 Pro
४८ मेगापिक्सेल असलेला हा शाओमीचा सर्वात स्वस्त फोन आहे. या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपयांपासून सुरू आहे.