पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वर्ल्ड इडली डे : घरीच तयार करा 'स्टफ रवा इडली'

संग्रहित छायाचित्र

अनेकांच्या सकाळच्या बेक्रफास्टमध्ये इडली सांबार किंवा इडलीला आवर्जून स्थान  असतं. अगदी साधा आणि सोपा पदार्थ असल्यानं  अनेकांची  याला पसंती आहे. विशेष म्हणजे आज वर्ल्ड इडली डे देखील आहेत. चला तर पाहू या विशेष दिनानिमित्तानं घरच्या घरी झटपट तयारी होणारी इडलीची हटके रेसिपी. या रेसिपीचं नाव आहे 'स्टफ रवा इडली'.

साहित्य :
इडलीसाठी लागणारं साहित्य 
- दोन वाट्या रवा
- अर्धी वाटी दही
- मीठ चवीनुसार
- १ चमचा इनो
स्टफिंगसाठी लागणारं साहित्य 
- १ चमचा तेल, बटर
- फोडणीसाठी जिरे, राई, हळद, तिखट मिर्चीपूड, बारीक चिरलेली मिरची, धणे, 
- बारीक चिरलेली कोथींबीर, उकडून कुस्करून घेतलेले बटाटे, उकडलेले मटार,

कृती
- एका मोठ्या भांड्यात रवा, दही आणि हे मित्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण पंधरा मिनिटे बाजूला ठेवा. 
- एका पॅनमध्ये तेल गरम करा त्यात वरील साहित्याची फोडणी द्या. उकडलेले बटाटे, मटार चवीनुसार मीठ टाका. हे स्टफिंग चांगलं एकजीव करून घ्या. वरुन कोथींबीर टाका. आता हे मिश्रण थंड करा.
- रवा- दहीच्या मिश्रणात इनो आणि थोडसं पाणी टाकून मिश्रण चांगलं फेटून घ्या.
- इडली पात्रात इडली तयार करुन घ्या.
- इडली तयार झाली की मधून कापून घ्या. यात स्टफिंग भरा. सँडविचप्रमाणे हे दिसलं पाहिजे.
- एका पॅनमध्ये बटर गरम करा, यात स्टफ इडली शॅलो फ्राय करून घ्या.