पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#WorldCoffeeDay : त्वचेसाठीही कॉफी आहे फायदेशीर

जागतिक कॉफी दिन

जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय पेयांपैकी कॉफी एक आहे. कॉफी कंटाळा घालवते, कॉफीमुळे तरतरी येते त्यामुळे अनेकजण कॉफी पितात. मात्र पेयाबरोबरच कॉफीचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी देखील केला जातो. अॅवॉन इंडियाच्या ट्रेनिंग हेड नितू प्रशेर यांनी  सौंदर्य खुलवण्यासाठी कॉफीचा कसा वापर केला जातो याबद्दल काही टीप्स दिल्या आहेत.

सकाळी राजाप्रमाणे न्याहारी करावी का?

- अनेकांच्या दिवसाची सुरूवात कॉफीनं होते. कॉफी हा असा नैसर्गिक घटक आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा नितळ व्हायला मदत होते.
- अनेक सौंदर्य प्रसाधनांनमध्ये कॉफीचा वापर प्रामुख्यानं केला जातो. कॉफीमध्ये असणारे कॅफेन त्वचेचा निस्तेजपणा घालवण्यास मदत करतो. 
- कॉफीमुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते. अतिनिल किरणांमुळे त्वचेची झालेली हानी कॉफीमुळे भरून निघण्यास मदत होते.
­-  कॉफीच्या बिया कुटून त्यापासून तयार केलेल्या पावडरचा स्क्रब म्हणूनही वापर करता येतो. 

पावसात खराब झालेल्या घरांच्या भिंतीचं सणासुदीच्या दिवसांत करायचं काय?