पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महिला चांगल्या पगाराची नोकरी का सोडतात? वाचा अहवाल काय म्हणतो

लांबचा प्रवास महिलांनी नोकरी सोडण्याचं प्रमुख कारण

लांबच्या प्रवासाचा त्रास नको म्हणून अनेकदा महिला चांगल्या पगाराची नोकरी सोडून घराजवळ असणारी आणि कमी पगाराची नोकरी स्विकारतात, असं ब्रिटन स्टॅटीस्टिकच्या अहवालातून समोर आलं आहे. पुरुष- स्त्रियांना  मिळणाऱ्या वेतनातील तफावती मागचं हे देखील कारण असू शकतं, असं यात म्हटलं आहे. 

पहिल्यांदाच प्रवासाची वेळ आणि  वेतनातील तफावत यांची सांगड घालून संशोधन करण्यात आलं आहे. लांबचा प्रवास हा मुद्दा देखील असमान वेतनासाठी कारणीभूत आहे असा निर्ष्कष ऑफिस फॉर नॅशनल (ONS)स्टॅटीस्टिकनं काढला आहे. 

दीर्घायुष्य हवंय? मग शीतपेय पिणे थांबवाच

 ऑफिसला जाण्यासाठी तासाभराहून अधिकचा प्रवास करावा लागत असेन तर अनेकदा २९.१ % महिला आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडतात. महिला प्रवासचं  अंतर कमी असेन अशी नोकरी निवडतात, मग ती नोकरी कमी पगाराची असली तरीही महिला तडजोड करायला तयार होतात. मात्र लांबच्या प्रवासामुळे नोकरी सोडण्याचं पुरुषांचं प्रमाण हे महिलांच्या तुलनेत  २३.९ %  आहे. 

कुटंबाची, लहान मुलांची काळजी घेण्यासाठी महिला अनेकदा आपली चांगली पगाराची नोकरी आणि वेळप्रसंगी करिअरदेखील सोडतात, अशी माहिती ब्रिटनच्या महिला विभागानं दिली आहे. 

अ‍ॅपल भारतीय ग्राहकांसाठी आणणार स्वस्त आयफोन

अनेकदा संसार आणि काम हे दोन्ही सांभाळणं महिलांसाठी कसरतीसारखं असतं. त्यामुळे लांबचा प्रवास हे महिलांनी नोकरी सोडण्याचं प्रमुख कारण असल्याचं ONS नं आपल्या संशोधनात म्हटलं आहे.