पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि मोकळी हवा घेण्यासाठी तिने चक्क विमानाचा इमर्जन्सी दरवाजाच उघडला

विमानाचा उघडलेला दरवाजा

काही प्रवासी प्रवास करताना काय करतील, याचा खरंच काही नेम नाही. बरं असे प्रवासी केवळ भारतातच असतात असे अजिबात नाही. जगाच्या वेगवेगळ्या भागात असे प्रवासी दिसतात. अशाच एका महिला प्रवाशाने चक्क गरम होतंय म्हणून विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. मोकळी हवा मिळावी, म्हणून तिने हे कृत्य केल्याचे ऐकून कोणत्याही समंजस माणसाला धक्काच बसेल.

एका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय?

संबंधित महिला शियामेन एअरलाईनच्या विमानाने वुहानहून लांझूकडे निघाली होती. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, विमानात तिला खिडकीकडेची सीट मिळाली होती. विमानात बसल्यावर अचानक तिला गरम होऊ लागल्याची जाणीव झाली. म्हणून तिने मोकळी हवा मिळावी, यासाठी विमानाच्या मागील बाजूस असलेला इमर्जन्सी दरवाजा उघडला. हे कृत्य करण्यापूर्वी सहप्रवाशांनी तिला तसे न करण्यास सांगितले होते. पण तिने कोणाचेच ऐकले नाही. 

विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडल्यानंतर त्यातील कर्मचाऱ्यांनी हा सगळा प्रकार लगेचच पोलिसांना कळविला. पोलिस लगेचच विमानात आले आणि त्यांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले. या सगळ्या प्रकारामुळे विमानाला तब्बल एक तास उशीर झाला तो भाग वेगळाच.