पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हिगन सौंदर्यप्रसाधनं त्वचेसाठी का गरजेची?

प्रातिनिधिक छायाचित्र

व्हिगन आहार म्हणजेच पूर्णपणे शाकाहारी आहाराच्या संकल्पनेबरोबरच व्हिगन सौंदर्यप्रसाधनं ही संकल्पनाही हळूहळू रुजू होत आहेत. सौंदर्यप्रसाधनं वापरणारा मोठा वर्ग जगभरात आहे. तेव्हा या वर्गानं व्हिगन सौंदर्यप्रसाधनं स्वीकारावी, यामुळे त्वचेस अधिक फायदा होतो असं बॉडी शॉप इंडियाच्या स्किनकेअर एक्स्पर्ट प्लबिता शर्मा म्हणाल्या.  तेव्हा व्हिगन सौंदर्यप्रसाधनाचे  फायदे कोणते ते पाहू.

जगातील पहिले पुरुष गर्भनिरोधक इंजेक्शन तयार, वाचा उपयुक्तता काय...

-  व्हिगन सौंदर्यप्रसाधनं त्वचेला योग्य ते पोषण पुरवतात. व्हिगन सौंदर्यप्रसाधनं ही वनस्पती, खनिजांपासून तयार केलेली असतात त्यामुळे त्वचेसाठी ती उपयुक्त असतात. 
- ही सौंदर्यप्रसाधनं प्राण्यांना उपद्रव पोहोचवत नाही. अनेकदा सौंदर्यप्रसाधनं तयार करताना त्यात प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जातो किंवा त्या  सौंदर्यप्रसाधनांची चाचणी ही प्राण्यांवर घेतली जाते मात्र व्हिगन सौंदर्यप्रसाधनांबाबत असं नसतं. 
- या सौंदर्यप्रसाधनांमध्ये कोणत्याही प्रकारची हानिकारक रसायनं नसतात, त्यामुळे त्वचेला हानी पोहोचत नाही. 

Health Tips: हिवाळ्यात चेहऱ्याची अशी घ्या काळजी!

- व्हिगन सौंदर्यप्रसाधनांमुळे पुरळ, मुरुम, त्वचेला खाज  येणे किंवा अन्य त्वचेच्या समस्या उद्भवत नाही. 
- त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या त्वचा प्रकारासाठी व्हिगन सौंदर्यप्रसाधनं ही  उपयुक्त असतात म्हणूनच ती वापरण्याचा सल्ला दिला जातो. 

महागड्या क्रिमला विसरा! ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने त्वचा होते चमकदार