पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून Redmi K20 Pro, Redmi K20 ची किंमत सर्वाधिक, कंपनीचा खुलासा

शाओमी कंपनी

शाओमी कंपनीनं आपला बहुप्रतिक्षित असा Redmi K20 Pro आणि Redmi K20 हा फोन नुकताच लाँच केला.  या फोन्सची  किंमत २१, ९९९ ते ३०, ९९९ रुपयांच्या दरम्यान आहे. फोन लाँच झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनं नाराजी दर्शवली. या फोनची किंमत ही जास्त असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. यावरून सोशल मीडियावर  नाराजी दर्शवणारा  हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला. 

शाओमी कंपनी आपल्या बजेट स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. स्वस्तात मस्त फोन  असल्यामुळे भारतीय ग्राहकांची सर्वाधिक पसंती ही शाओमीला आहे. कंपनीचा मोठा ग्राहकवर्ग हा भारतात आहे. मात्र नवा फोन लाँच  केल्यानंतर भारतीय ग्राहकांनी दाखवलेल्या नाराजीवर कंपनीनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  कंपनीचे उपाध्यक्ष मनू कुमार जैन यांनी चाहत्यांना ट्विटरवर एक पत्र लिहिलं आहे  त्यामध्ये जैन यांनी Redmi K20 Pro आणि Redmi K20 ची किंमत ही २० हजारांहून अधिक का आहे हे सांगितलं आहे. 

'लाखो लोकांना या फोनमध्ये अधिक रस आहे हे जाणून खूपच आनंद झाला. मात्र या फोनच्या किंमतीवरून अनेकांनी आक्षेप घेतला आहे. आम्ही नेहमीच ग्राहकांचं म्हणणं ऐकून घेतो. त्यांची प्रतिक्रिया आमच्यासाठी नेहमीच महत्त्वाची असते.  मात्र या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५  प्रोसेसर आहे. या फोनमधली कार्यप्रणाली अधिक जलदगतीनं काम करते. फोनमध्ये अॅमोलेड डिस्प्ले आहे. ४५ मेगापिक्सेल कॅमेरा आणि २० मेगापिक्सेल पॉप अप सेल्फी कॅमेरा आहे. हे फीचर असणाऱ्या सर्व फोनची किंमत ही ४० ते ५०  हजारांच्या घरात आहे. मात्र शाओमीच्या फोन्सची किंमत २१, ९९९ ते ३०, ९९९ रुपयांच्या दरम्यान आहे हे देखील त्यांनी ग्राहकांना दाखवून दिलं.

Redmi K20 Pro आणि Redmi K20 चे फीचर्स आणि किंमत 
 Redmi K20 Pro 
- ६. ३९ इंचाचा अॅमोलेड एचडी डिस्प्ले 
- २० मेगापिक्सेल पॉप अप सेल्फी कॅमेरा
- ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, ८ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि १३ मेगापिक्सेल वाइड अँगल सेन्सॉर, २० मेगा पिक्सेल पॉपअप सेल्फी 
- ६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोअरेज
- ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज
किंमत - 
६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोअरेज- २७,९९९ रुपये
८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेज - ३०, ९९९ रुपये

Redmi K20 
- ६. ३९ इंचाचा अॅमोलेड एचडी डिस्प्ले 
- क्वालकॉम न्यू स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर 
- ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, २० मेगा पिक्सेल पॉपअप सेल्फी 
किंमत 
६ जीबी रॅम ६४ जीबी स्टोअरेज - २१, ९९९ रुपये 
६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोअरेज- २३, ९९९  रुपये