पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॉट्सऍपकडून लवकरच नवी सुविधा... मेसेज ठराविक वेळेने होणार गायब

व्हॉट्सऍप

व्हॉटसऍपकडून लवकरच एक नवी सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. सध्या व्हॉट्सऍपवर आलेला कोणताही संदेश वापरकर्त्याला स्वतःहून डिलिट करावा लागतो. पण आता नव्या सुविधेनुसार वापरकर्त्याने ठरविलेल्या मुदतीनंतर त्याच्या व्हॉट्सऍपवरील संदेश स्वतःहून गायब होणार आहेत. आता ही मुदत एक तास, एक दिवस, एक आठवडा, एक महिना किंवा एक वर्ष कोणतीही असू शकते. मुदतही वापरकर्त्यानेच ठरवायची आहे. त्याचबरोबर कोणत्या चॅटसाठी किंवा व्हॉट्सऍप ग्रुपसाठी ही सुविधा सुरू करायची हे सुद्धा वापरकर्त्यालाच निश्चित करायचे आहे.

'एक भगतसिंह देशासाठी फाशीवर गेले तर एकानं लोकशाहीची हत्या केली'

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सऍप बिटा व्हर्जन २.१९.३४८ मध्ये अँड्राईड मोबाईलधारकांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली आहे. अद्याप सर्वसामान्य ग्राहकांसाठी किंवा बिटा वापरकर्त्यांसाठी ही सुविधा उपलब्ध नाही. कारण त्यावर कंपनीकडून काम करण्यात येते आहे. डिलिट मेसेज असे या सुविधेचे नाव आहे. दोघांमधील किंवा ग्रुपमधील व्हॉट्सऍप चॅटिंगसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

बहुमत सिध्द करण्यास अडचण येणार नाही: दानवे

व्हॉट्सऍपची नवी डिलिट मेसेज सुविधा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवी नाही. व्हॉट्सऍपच्या स्पर्धक कंपन्या टेलिग्राम आणि सिग्नल यांनी आधीच आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा दिली आहे. व्हॉट्सऍपचा बहुप्रतिक्षित डार्क मोड लवकरच ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यातही ही सुविधा देण्यात येणार आहे.