पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आयफोनसाठी व्हॉट्सऍपचे नवे अपडेट्स... नव्या सुविधा

व्हॉट्सऍप

व्हॉट्सऍपकडून आयफोन ग्राहकांसाठी नवे अपडेट जारी करण्यात आले आहे. यामध्ये काही नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ग्रुपच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये बदल, कॉल वेटिंग, अंध व्यक्तींसाठी ब्रेल की-बोर्ड आणि नव्याने डिझाईन केलेली चॅट स्क्रिन यांचा समावेश आहे. 

सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले: खडसे

आयफोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी व्हॉट्सऍपचे नवे २.१९.१२० हे अपडेट्स ऍप स्टोअरवर उपलब्ध आहेत. ग्राहकांना ऍप स्टोअरवर जाऊन नवे अपडेट्स त्यांच्या आयफोनमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहेत. नव्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये ग्राहकांना नको त्या व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये स्वतःला ऍड करण्यापासून रोखता येणार आहे. 

कॉल वेटिंग सुविधेमध्ये ग्राहकांना एका व्हॉट्सऍप कॉलवर बोलत असताना दुसरा कॉल स्वीकारता येणार आहे. याआधी अशा पद्धतीने एका व्हॉट्सऍप कॉलवर बोलताना ग्राहकाला दुसरा कॉल घेता येत नव्हता. 

BLOG: फडणवीसजी विक पॉइंट शोधला, पण स्ट्रोकपूर्वी ही चूक केलीत

नव्या अपडेट्समध्ये व्हॉट्सऍप चॅट स्क्रिनचे डिझाईनही बदलण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना व्हॉट्सऍपवर आलेले संदेश सहजपणे बघता येणार आहेत. आयफोनवरील व्हॉट्सऍपमध्ये मजकूर अधिक नेमकेपणाने दिसण्यातही यामुळे मदतच होणार आहे.