पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून लाखो स्मार्टफोनमध्ये पुढील वर्षांपासून चालणार नाही WhatsApp!

  व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या जगभरात कमालीची आहे. विशेषत: हे अ‍ॅप वापरणारा मोठा वर्ग हा भारतात आहे. मात्र २०२० पासून जगभरातील लाखो स्मार्टफोनमध्ये  व्हॉट्स अ‍ॅप हे अ‍ॅप काम करणं कायमचं बंद होणार आहे.  विंडोज फोन धारकांच्या फोनमध्ये ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्स अ‍ॅप हे कायमचं बंद होणार आहे. 

व्हॉट्स अ‍ॅप कॉलिंगसाठी कंपनीचे नवे फीचर

हे अ‍ॅप जगभरातील लक्षावधी स्मार्टफोनला तांत्रिकदृष्ट्या सपोर्ट करु  शकत नाही त्यामुळे फेब्रुवारी २०२० पासून  iOS 8 व त्याहून जून्या ऑपरेटिंग सिस्टम असणारे आयफोन आणि 2.3.7 किंवा त्याहून जुने व्हर्जन असलेल्या अँड्राइड फोनमध्ये  व्हॉट्स अ‍ॅप  चालणार नसल्याचं व्हॉट्स अ‍ॅपची मालकी असलेल्या फेसबुकनं स्पष्ट केलं आहे. 

एअरटेलची वायफाय व्हॉईस कॉल सेवा भारतात सुरू

तर दुसरीकडे मंगळवार रात्रीपासून अनेक स्मार्टफोन धारकांना मेसेज पाठवण्यात आणि स्वीकारण्यात अडचणींचा  सामना करावा लागत होता.