पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॉट्स अ‍ॅपमध्ये येणार काही महत्त्वाचे फीचर

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅप युजर्ससाठी नवनवे फीचर्स विकसीत करत आहे. आगामी काळात युजर्सनां या अ‍ॅपवर आणखी काही महत्त्वाचे फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यातले काही फीचर या अ‍ॅपच्या अपडेटेड व्हर्जनवर उपलब्ध आहेत तर काही लवकरच उपलब्ध होतील. 

Multiple device support
व्हॉट्स अ‍ॅप अकाऊंट हे एकाच वेळी अनेक डिव्हाइसमध्ये सुरू करता येणार आहे. सध्या  व्हॉट्स अ‍ॅप हे एकावेळी केवळ फोनमध्येच वापरता येते. कंपनीनं 'व्हॉट्स अ‍ॅप वेब'चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये व्हॉट्स अ‍ॅप सुरू करता येते. मात्र त्यासाठी तुमचा मोबाइल हा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या जवळ असणं आवश्यक आहे. मात्र आता एकाच वेळी ते विविध  डिव्हाइसमधून लॉग इन करता येणार आहे. 

गुगलच्या Titan M चं संरक्षक कवच भेदणाऱ्याला दहा कोटींचं बक्षीस जाहीर

Dark Mode
गेल्या कित्येक दिवसांपासून या फीचर्सची चर्चा आहे. या फीचरमुळे डोळ्यांना होणारा त्रास कमी होणार आहे. सूर्यास्तानंतर फोनमधल्या ब्राइट लाइटमुळे डोळ्यांना त्रास होतो म्हणूनच युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्स अ‍ॅप लवकरच डार्क मोड हे फीचर आणणार आहे. 

Netflix streaming support
व्हॉट्स अ‍ॅपवर बोलत असताना युजर्स नेटफ्लिक्सवर व्हिडिओही पाहू शकतात. picture-in-picture mode द्वारे व्हॉट्स अ‍ॅपवर चॅट करत असताना खाली नेटफ्लिक्सवरचे व्हिडिओही सुरू राहणार आहे. काही अपडेटेड व्हर्जनमध्ये हे फीचर सुरुही  झालं आहे. 

शाओमीनं परवडणाऱ्या दरात भारतात लाँच केले फिटनेस बँड