पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॉट्स अ‍ॅपच्या 'स्टेटस' फीचरमध्ये होणार हा बदल

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅप हे युजर्ससाठी नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतं. व्हॉट्स  अ‍ॅपनं आपल्या अ‍ॅपमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक महत्त्वाचे बदल केले. अनेक फीचर्स अपडेट केली. त्यामुळे हे अ‍ॅप वापरणं युजर्सनां देखील सोयीचं गेलं. आता या अ‍ॅपमध्ये अधिक सुधारणा व्हावी यासाठी व्हॉट्स अ‍ॅप प्रयत्नात आहे.  आता लवकरच व्हॉट्स अ‍ॅप आपल्या  'स्टेटस' या फीचरमध्ये काही महत्त्वाचे बदल  करणार आहे. 

व्हॉट्स अ‍ॅप 'स्टेटस' हे फीचर खूपच लोकप्रिय आहे. या स्टेटसमध्ये एक महत्त्वाचं अपडेट करण्याचं व्हॉट्स अ‍ॅपनं ठरवलं आहे. त्यानुसार यापुढे युजर्सनां आपलं व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस  फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही शेअर करता येणार आहे.  

भारतीय प्रवाशांसाठी गुगलंचं ‘Stay Safer’ फीचर

२००९ मध्ये व्हॉट्स अ‍ॅप लाँच झालं,  २०१४ साली ते फेसबुकनं विकत घेतलं. त्यानंतर फेसबुकनं या  अ‍ॅपमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले.  मेसेजिंग व्यतिरिक्त मोफत व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंगची सेवा या अ‍ॅपनं दिली. त्याचप्रमाणे फोटो, फाईल्स, व्हिडिओ, ऑडिओ पाठवणंही या  अ‍ॅपमुळे शक्य झालं. 

आयफोनमध्ये असं सुरू करा 'डार्क मोड'

या व्यतिरिक्त व्हॉट्स अ‍ॅप येत्या काही महिन्यांत आणखी पाच फीचर्सही आणणार आहे. त्यातलं डार्क मोड हे फीचर चर्चेचा विषय ठरलं आहे.