पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ग्रुप व्हिडिओ कॉलिंगची मर्यादा वाढवण्याचा व्हॉट्स अ‍ॅपचा विचार

व्हॉट्स अ‍ॅप कॉलिंग

कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देश लॉकडाऊन आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सगळेच घरीच थांबून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनमुळे आपल्या प्रिय व्यक्तींना भेटणं शक्य नाही, मात्र सुदैवानं काही सोशल मीडिया साईट आणि मेसेजिंग अ‍ॅपमुळे अनेकजण  एकमेकांच्या संपर्कात आहे. याच पार्श्वभूमीवर व्हॉट्स अ‍ॅपनं देखील आपल्या व्हिडिओ कॉलिंग या फीचरमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

लाल आयफोनच्या विक्रीतून येणारी रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी देणार

सध्या व्हिडिओ कॉलिंगद्वारे एकाचवेळी ४ जण एकमेकांशी संपर्कात येऊ शकतात. मात्र व्हॉट्स अ‍ॅप ही मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती WABetaInfo नं दिली आहे. एकावेळी किती जण व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्कात येऊ शकतात याचा आकडा जाहीर झालेला नाही, मात्र व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंगद्वारे १२ जणांशी एकत्र संवाद साधता येईल असं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी गुगल ड्युओनं देखील व्हिडिओ कॉलिंगची मर्यादा वाढवून ती १२ पर्यंत नेली होती. 

अफवांचे मेसेज रोखण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपची नवी योजना