पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना संक्रमणाचा असाही परिणाम, व्हॉट्सऍपच्या वापरात सर्वाधिक वाढ

व्हॉट्सऍप

कोरोना विषाणूच्या जगभरातील संक्रमणानंतर मोबाईलवरील ऍप वापरण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यातही भारतात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनेकजण घरातच थांबून काम करीत आहेत. त्यामुळे वेगवेगळे ऍप सतत बघण्याचे प्रमाण वाढले आहे. पण या सगळ्यामध्ये व्हॉट्सऍप वरच्या स्थानावर आहे. व्हॉट्सऍप वापरण्याच्या प्रमाणात ४० टक्के वाढ झाली आहे. 'कंटार'ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.

ईएमआय ३ महिन्यांसाठी स्थगित, RBI चा मोठा दिलासा

कोरोना विषाणूच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये व्हॉट्सऍपच्या वापरामध्ये २७ टक्के वाढ झाल्याचे दिसले. नंतरच्या टप्प्यात ही वाढ ४१ टक्क्यांवर गेली होती. तर त्यानंतर ५१ टक्क्यांपर्यंत वर गेली होती. अर्थात जगाच्या कोणत्या भागात किती वाढ झाली याची नेमकी आकडेवारी या अहवालात दिलेली नाही. फक्त स्पेनमध्ये ही वाढ सर्वाधिक ७६ टक्क्यांपर्यंत गेल्याचे म्हटले आहे.

व्हॉट्सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांच्या वापरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून आले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. विशेषतः ३५ वर्षांखालील युजर्सकडून या तिन्हींचा जास्त वापर केला जात आहे. संदेश पाठविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ऍपच्या वापरामध्येही वाढ झाली आहे. १८ ते ३४ वयोगटातील लोकांकडून हे ऍप सर्वाधिक वापरले जाताहेत.

केंद्र सरकारचे पॅकेज शेतीसाठी पुरसे नाही - शरद पवार

फेसबुकने या आठवड्याच्या सुरुवातीलाच मेसेंजरच्या वापरामध्ये जगभरात ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे म्हटले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:WhatsApp sees highest engagement during Covid 19 pandemic with 40 percent increase in usage Kantar report