पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WhatsApp new update : बिटा व्हर्जनमध्ये नवे इमोजी आणि डार्क मोड ऐवजी नाईट मोड!

व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या बिटा व्हर्जनमध्ये वापरकर्त्यांच्या विचार करून अनेक उपयुक्त बदल करण्यात आले आहेत. हे फिचर वापरण्यासाठी नवे व्हर्जन प्रसारित झाल्यानंतर वापरकर्त्यांना आपले व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे लागेल. महत्त्वाच्या बदलांमध्ये नव्याने डिझाईन करण्यात आलेले १५५ इमोजी अ‍ॅपमध्येच देण्यात आले आहेत. WABetaInfo या वेबसाईटने ही माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप कोणते नवे फिचर आणणार हे सर्वातआधी याच वेबसाईटवर कळते.

तुमचं व्हॉट्स अ‍ॅप अपडेट करा कारण...

अ‍ॅंड्राईडसाठीचे नवे बिटा व्हर्जन २.१९.१३९ मध्ये डार्क मोड परत आणण्यात आला आहे. फक्त त्याचे नाव डार्क मोडऐवजी नाईट मोड असे ठेवण्यात आले आहे. अद्याप हे फिचर बिटा व्हर्जनमध्ये सुरू करण्यात आलेले नाही. म्हणजेच अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये ते दिसत नाही. पण कोडमध्ये दिसते, असे वेबसाईटने म्हटले आहे. चॅट लिस्ट, कॉल आणि स्टेटस यासाठीच नाईट मोड काम करू शकतो. नाईट मोडमध्ये अ‍ॅक्शन बटण (कोणतीही कृती करण्यासाठी वापरले जाणारे) सध्यातरी हिरव्या रंगात दिसत असले, तरी ते लवकरच पांढऱ्या रंगात दिसेल. हे व्हर्जन वापरकर्त्यांसाठी कधी प्रसारित होणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही, असे टिप्स्टरने म्हटले आहे.

नव्या व्हर्जनमध्ये इमोजींच्या डिझाईनवर काम करण्यात आले असून, ते काहीसे लहान करण्यात आले आहेत. पण त्यातून नेमके काय सांगायचे आहे, याचा अर्थबोध होण्यासाठी ते जास्त उपयुक्त करण्यात आले आहेत. काही इमोजी तर पूर्णपणे बदलण्यात आले आहेत. 

ठरले! अ‍ॅपलच्या रिटेल स्टोअरची ठिकाणे निश्चित

व्हॉट्सअ‍ॅपच्या बिटा व्हर्जनवर हे नवे फिचर उपलब्ध आहेत. जर तुम्ही बिटा टेस्टर ग्राहक असाल, तरच तुम्हाला ते बघता येतील किंवा वापरता येतील. अन्यथा अधिकृतपणे व्हॉट्सअ‍ॅपकडून ते प्रसारित केले जात नाही, तोपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल.