पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अफवांचे मेसेज रोखण्यासाठी फॉरवर्डेड मेसेजविरोधात व्हॉट्स अ‍ॅपची नवी योजना

प्रातिनिधीक छायाचित्र

लॉकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूसंदर्भात अनेक अफवांचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अफवांचे मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याकरता व्हॉट्स अ‍ॅपनं फॉरवर्डेड मेसेज पाठवण्याची मर्यादा घटवली आहे.

कोरोना क्वारंटाईन वॉर्डसजवळ पशू-पक्षी येऊ देऊ नका, अन्यथा...

आतापर्यंत सर्वाधिक फॉरवर्डेड मेसेजवर वरच्या बाजूला डबल टीक दिसते. फॉरवर्डेड मेजेस एकावेळी जास्तीत जास्त लोकांना पाठवता येतात मात्र आता ते एका वेळी एकाच व्यक्तीला पाठवता येणार आहेत. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळात व्हायरल होणारे मेजेस रोखण्यासाठी कंपनीनं काही मर्यादा आणल्या होत्या त्यामुळे सर्वाधिक फॉरवर्डेड मेसेज एकावेळी पाच जणांना पाठवता येत होते, या काळात हे मेसेज पाठवणाऱ्यांची संख्या २५ % नीं घटली होती. 

कोरोनाची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूत

आता या मर्यादा कंपनीकडून अधिक वाढवण्यात आल्या असून केवळ एकाच व्यक्तीला मेसेज फॉरवर्ड करता येणार आहेत.