पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

WhatsApp वर आला ‘डार्क मोड’, असा करायचा वापर

डार्क मोड

गेल्या काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर  व्हॉट्स अ‍ॅपकडून डार्क मोड सर्व अँड्राइड आणि अ‍ॅपल युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 
या नव्या फीचरमुळे व्हॉट्स अ‍ॅप नव्या रुपात वापरण्याचा आनंद युजर्सनां घेता येणार आहे. कमी प्रकाशात डोळ्यांना जास्त त्रास होवू नये याकरता हे फीचर उपयोगी पडणार आहे, असं कंपनीनं आपल्या ब्लॉगमध्ये लिहित डार्क मोड आल्याची अधिकृत घोषणा केली आहे. 

iOS साठी फेसबुक मेसेंजर नव्या रुपात, वेग आणखी वाढला

असं करायचं  ‘डार्क मोड' सुरु 
- डार्क मोड सुरु करण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपचं नवीन व्हर्जन युजर्सनां डाऊनलोड करावं लागेल. 
- त्यानंतर डार्क मोड सुरू करण्यासाठी ग्राहकांना पुढील पद्धतीने जावे लागेल. सेटिंग्ज - चॅट्स - डिस्प्ले - थीम - डार्क थीम.
- व्हॉट्स अ‍ॅपचं नवीन व्हर्जन अपडेट केलं असेल आणि तुमच्या मोबाइलमध्ये पहिल्यापासून डार्क थिम ( अनेकदा युजर्स मोबाइलची बॅटरी वाचवण्यासाठी किंवा डोळ्यांना जास्त त्रास होऊ नये म्हणून डार्क थिम  अ‍ॅक्टीव्हेट करतात.) अ‍ॅक्टीव्हेटेड असेल तर व्हॉट्स अ‍ॅप अपडेट झाल्यानंतर ऑटोमॅटीक डार्क मोडही सुरु होईल. 
- युजर डार्क मोड फीचर त्यांना पाहिजे तेव्हा ऑन किंवा ऑफ करु शकतात. या फीचरमुळे रात्रीच्यावेळी चॅटींग करताना याचा डोळ्यांवर फार ताण पडत नाही, तसेच बॅटरीही वाचते. 
भारतात अ‍ॅपलकडून या आयफोनच्या किमतीत वाढ