पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसमध्ये झालेला हा बदल माहितीये?

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅपनं काही वर्षांपूर्वी व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस हे  फीचर युजर्सनां उपलब्ध करून दिलं होतं.  हे  फीचर युजर्सनां खूपच आवडलं होतं. या स्टेटस फीचरद्वारे युजर्सनां फोटो, व्हिडीओ, लिंक शेअर करता येते. आता हेच स्टेटस  युजर्सनां फेसबुकवरही शेअर करता येणार आहे. 
फेसबुकवर व्हॉट्स अ‍ॅप स्टेटससारखा फेसबुक स्टोरी हा पर्याय आहेच. मात्र आता व्हॉट्स अ‍ॅपवरचे स्टेटस तिथे युजर्सनां थेट शेअर करता येणार आहेत. थोडक्यात व्हॉट्स अ‍ॅपनं युजर्सनां  “share to Facebook Story.” हा पर्याय उपलब्ध करून  दिला आहे. 

नको असलेल्या स्टेटससाठी व्हॉट्स अ‍ॅपचा तोडगा

असे करता येईल स्टेटस शेअर 
- नेहमीप्रमाणे तुम्ही व्हॉट्स अ‍ॅपवर स्टेटस अपलोड करा.
- व्हॉट्स अ‍ॅपवर स्टेटस अपलोड झाल्यानंतर तुम्हाला “share to Facebook Story”  नोटिफिकेशन दिसेन.
- त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फेसबुक स्टोरीमध्ये शेअर करता येईल. 

ऑफिस बॅगचं वजन नेमकं हवं तरी किती?