पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चुकून भलत्याच युजर्सनां फोटो पाठवण्यापूर्वी व्हॉट्स अ‍ॅप देणार इशारा

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅपवरून चुकून फोटो, मेसेज भलत्याच युजर्सनां पाठवले जातात. हे मेसेज पाठवल्यानंतर तुम्ही ते कायमस्वरूपी डीलीट करू शकता. व्हॉट्स अ‍ॅपनं असं फीचरचं दीड वर्षांपूर्वी लाँच केलं  होतं. मात्र हा झाला चूक झाल्यानंतर करण्याचा उपाय. आता व्हॉट्स अ‍ॅप असं फीचर  आणणार आहे जे तुम्हाला चूक होण्यापूर्वीच सावधानतेचा इशारा देणार आहे. 

चालक चुकीच्या रस्त्यानं नेतोय, गुगल करणार प्रवाशांना सावध

व्हॉट्स अ‍ॅप सध्या आपल्या नव्या फीचरची चाचणी करत आहे. या फीचर्सचा फायदा युजर्सनां होणार आहे. एखादा फोटो पाठवण्यापूर्वी युजर्सच्या स्क्रीनवर पुन्हा एकदा सूचना येणार आहे. ज्यामुळे तुम्ही योग्य व्यक्तीला ते फोटो पाठवत आहात की नाही याची खातरजमा तुम्हाला करता येणार आहे. ही खातरजमा झाल्यानंतर तुम्ही फोटो सेंड करू शकता. यामुळे चुकीच्या व्यक्तीला मेसेज पाठवून होणारा त्रास टाळता येणार आहे. याव्यतिरिक्त व्हॉट्स अ‍ॅप picture-in-picture फीचरवरही काम करत आहे. 

इन्स्टाग्राममुळे सर्वाधिक मोबाइल डेटा खर्च होतोय? अशाप्रकारे वाचवा तुमचा डेटा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:WhatsApp is working on a new feature that prevent users to accidentally send images to the wrong contact