पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अल्पवयीन मुलांच्या अकाऊंटवर व्हॉट्स अ‍ॅप लावणार लगाम

व्हॉट्स अ‍ॅप

अल्पवयीन मुलांचे व्हॉट्स अ‍ॅप अकाऊंट बंद करण्याचा निर्णय कंपनी घेणार असल्याच्या चर्चा आहेत. वयाची अट पूर्ण न केलेल्या व्हॉट्स अ‍ॅप अकाऊंटवर बंदी घालण्याचा प्रयत्न येत्या काळात व्हॉट्स अ‍ॅपचा असणार आहे. 

कंपनीच्या नियमाप्रमाणे युरोपीय देशांतील युजर्ससाठी किमान वयोमर्यादा ही १६ वर्षे होती. तर युरोप वगळता इतर देशांतील युजर्ससाठी किमान वयोमर्यादा ही १३ वर्षे  आहे. मात्र हे अ‍ॅप आता १३ वर्षांहून लहान मुलं वापरत असल्याचं कंपनीच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे वयाची अट पूर्ण न करणाऱ्या युजर्सचं खातं बंद होणार असल्याचं समजत आहे. 

इन्स्टाग्रामचे ते फीचर व्हॉट्स अ‍ॅपमध्येही

काही दिवसांपूर्वी कंपनीनं खास भारतीयांसाठी “frequently forwarded” हे फीचर आणलं होतं. गेल्या काही वर्षांत याच अ‍ॅपच्या माध्यमांतून अनेक अफवांचे आणि खोटे मेसेज फॉरवर्ड होण्याचं प्रमाण वाढलं आहे.  यावर तोडगा काढण्यासाठी कंपनीनं  “frequently forwarded” हे फीचर आणलं आहे. 

या फीचरमुळे आलेले मेसेज हे सर्वाधिक वेळा पाठवण्यात आले आहेत हे युजर्सनां समजणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:whatsApp is reportedly working on a new feature to ban accounts that dont meet age requirement