पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॉट्स अ‍ॅपमुळे मोबाइलची बॅटरी उतरते, स्मार्टफोन धारकांची तक्रार

व्हॉट्स अ‍ॅप

अनेक स्मार्टफोन धारकांनी व्हॉट्स अ‍ॅपमुळे मोबाइलची बॅटरी ड्रेन होत असल्याची तक्रार केली आहे. काही अ‍ॅपल युजर्सनांदेखील अशाच प्रकारचा अनुभव आला आहे. सुरुवातीला  WAbetainfo वरुन व्हॉट्स अ‍ॅपमुळे मोबाइलची बॅटरी उतरत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर अनेक युजर्सनं अशाच प्रकारची तक्रार केली. 

तुम्हाला कोणता ई-मेल आलाय का?, युट्यूबच्या नियमांमध्ये मोठा बदल

व्हॉट्स अ‍ॅप मोबाईलमधली सर्वाधिक बॅटरी वापरत असल्याचं WAbetainfoनं निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर  अनेकांनी अशाच प्रकारची समस्या आपल्यालाही जाणवत असल्याचं दाखवून दिलं. रेडीट फोरमच्या माहितीनुसार शाओमी रेडमी नोट ७, सॅमसंग आणि वनप्लस धारकांनी ही समस्या जाणवत असल्याची तक्रार केली आहे. 

अनावश्यक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचे नाही? मग हे करा....

विशेषत:  व्हॉट्स अ‍ॅप अपडेट केल्यानंतर नव्या व्हजर्नमुळे बॅटरी  ड्रेन होत असल्याची तक्रार काही ट्विटर युजरनं केली आहे.