पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॉट्स अ‍ॅपमध्ये येणार हे तीन नवे फीचर्स

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅप हे भारतात सर्वाधिक वापरले जाणारे अ‍ॅप आहे. गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्स अ‍ॅपमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत व्हॉट्स अ‍ॅपमध्ये आणखी तीन महत्त्वाचे फीचर्स येणार आहेत. हे फीचर्स कोणते ते पाहू. 

डार्क मोड
गेल्या कित्येक दिवसांपासून या फीचर्सची चर्चा आहे. या फीचरमुळे डोळ्यांना होणारा त्रास कमी होणार आहे. सूर्यास्तानंतर फोनमधल्या ब्राइट लाइटमुळे डोळ्यांना त्रास होतो म्हणूनच युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्स अ‍ॅप लवकरच डार्क मोड हे फीचर आणणार आहे. 

फॉरवर्ड मेसेजसाठी वेगळा टॅग
व्हॉट्स अ‍ॅपनं काही वर्षांपूर्वीच फॉरवर्ड मेसेजवर 'forwarded' चं लेबल लावलं होतं. यामुळे संबंधीत मेसेज हा फॉरवर्ड केला गेल्याचं आपल्याला समजत होतं. मात्र आता “frequently forwarded” हा लेबल देखील येणार आहे यामुळे  तो मेसेज सर्वाधिक लोकांनी फॉरवर्ड केला होता हे लोकांना कळणार आहे. 

नको असलेले स्टेटस अदृश्य होणार 
फेसबुकच्या 'unfollow' पर्यायासारखंच ‘hide muted status’ हा पर्यायदेखील लवकरच व्हॉट्स अ‍ॅपमध्ये येणार आहे. यामुळे एखादा व्यक्ती ब्लॉक होणार नाही मात्र त्याचा स्टेटस फीड तुम्हाला पूर्णपणे हाइड करता येणार आहे. सध्या नको असलेल्या व्यक्तीचे स्टेटस फीड आपण म्यूट करू शकतो. मात्र ते सर्वात शेवटी ब्लरमध्ये दिसतातच पण लवकरच म्यूट स्टेटस पूर्णपणे अदृश्य होणार आहेत.