पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सर्वाधिक पाठवण्यात येणाऱ्या व्हॉट्स अ‍ॅप मेसेजवर आता 'frequently forwarded' चा ठपका

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅप हे भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं अ‍ॅप. भारतातील कोट्यवधी युजर्स संवाद साधण्यासाठी हे  अ‍ॅप वापरतात. मात्र गेल्या काही वर्षांत याच अ‍ॅपच्या माध्यमांतून अनेक अफवांचे आणि खोटे मेसेज फॉरवर्ड होण्याचं प्रमाण वाढलं आहे.  यावर तोडगा काढण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. आता सर्वाधिक फॉरवर्ड केल्या जाणाऱ्या मेसेजवर कंपनीनं “frequently forwarded”चं लेबल लावलं आहे.  व्हॉट्स अ‍ॅपचं हे बहुचर्चित फीचर भारतीय युजर्ससाठी उपलब्ध झालं आहे. 

सॅमसंग ‘Galaxy Fold’ या दिवशी होणार लाँच

तुम्हाला आलेले मेसेज हे फॉरवर्ड केलेले आहेत हे  युजर्सनां पटकन ओळखता येतं. मात्र हा  मेसेज किती वेळा इतरांना पाठवला जातो हे  समजत नाही. पण आता “frequently forwarded” मुळे तुम्हाला आलेले मेसेज हे सर्वाधिक वेळा पाठवण्यात आले आहेत हे युजर्सनां समजणार आहे.  जेव्हा खोट्या बातम्या, अफवा पसरवल्या जातात त्यावेळी हे फीचर कामी येणार आहे, अशी आशा कंपनीनं व्यक्त केली आहे. 

कमी रॅमच्या मोबाईलसाठी आता पबजी लाईट भारतात

सर्वाधिक पाठवलेले मेसेज ओळखू येण्यासाठी “frequently forwarded” या लेबलबरोबरच त्यावर डबल अॅरो आयकॉनही असणार आहे. हे मेसेज पाठवताना युजर्सनां सूचनाही येणार आहेत.