पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॉट्स अ‍ॅपमधल्या या ट्रिक्स तुम्हाला माहितीये का?

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅप हे भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये गेल्या काही वर्षांत युजर्सच्या सोयीसाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. यात काही महत्त्वाचे फीचरही देण्यात आले आहेत. हे फीचर किंवा या अ‍ॅपमधल्या काही ट्रिक्स अनेकांना माहिती नाहीत. या ट्रिक्स किंवा फीचरमुळे तुमचं व्हॉट्स अ‍ॅप वापरणं अधिक सुलभ होऊ शकतं. 

... म्हणून लाखो स्मार्टफोनमध्ये पुढील वर्षांपासून चालणार नाही WhatsApp!

व्हॉट्स अ‍ॅप न उघडताही पाठवू शकता मेसेज 
हो, तुम्ही व्हॉट्स अ‍ॅप न उघडताही तुमच्या व्हॉट्स अ‍ॅप युजर्सनां मेसेज पाठवू शकता. यासाठी गुगल असिस्टंट किंवा सिरीची मदत तुम्हाला होऊ शकते. यांच्या मदतीनं तुम्ही व्हॉईस मेसेज पाठवू शकता.

ब्यू टीक ऑफचे फायदे
तुम्ही ब्यू टीक ऑफ करू शकता. ब्यू टीक ऑन असल्यास तुम्ही मेसेज वाचले आहेत किंवा नाही हे युजर्सनां कळतं. मात्र जर एखाद्या व्यक्तीला उत्तर देणं  तुम्हाला खरंच टाळायचे असल्यास ब्यू टीक ऑफ करून तुम्ही ठेवू शकता, यामुळे तुम्ही मेसेज वाचले की नाही हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही. 

 

व्हॉट्स अ‍ॅप कॉलिंगसाठी कंपनीचे नवे फीचर

कोणते युजर्समुळे झालं व्हॉट्स अ‍ॅप स्टोअरेज फुल 
कोणता व्हॉट्स अ‍ॅप युजर किंवा कोणत्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमुळे तुमचं सर्वाधिक स्टोअररेज फुल झालं आहे याची माहितीही तुम्हाला मिळू शकते. यासाठी अ‍ॅपच्या वर असलेल्या तीन डॉटवर क्लिक करावं. त्यानंतर data and storage usage चा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करून storage usage या पर्यायावर क्लिक करावं. इथे तुम्हाला सर्वाधिक स्टोअररेज फुल करणाऱ्या युजर्सची यादी दिसेन.