पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॉट्स अ‍ॅपचं 'डार्क मोड' फीचर नेमकं आहे तरी काय?

व्हॉट्स अ‍ॅप

गेल्या काही  महिन्यांपासून व्हॉट्स अ‍ॅपच्या 'डार्क मोड' या नव्या फीचरची चर्चा आहे. हे फीचर अद्यापही ग्राहकांसाठी उपलब्ध झालेलं नाही. मात्र हे फीचर नेमकं काय आहे त्यात कोणत्या अपडेट्स युजर्सनां मिळणार आहे ते  पाहू. 

व्हॉट्स अ‍ॅपच्या 'डार्क मोड' फीचरमधले  काही अपडेट्स समोर आले आहेत. त्यानुसार यात “set by battery saver option” म्हणजेच बॅटरी वाचवण्याचा पर्यायही देण्यात आला होता. तसेच व्हॉइस कॉलिंगच्या वेळी लाइट आणि डार्क अशा थीम्सही असणार आहेत. 

आयफोनसाठी व्हॉट्सऍपचे नवे अपडेट्स... नव्या सुविधा

'डार्क मोड' मधील बॅटरी सेव्हर म्हणजेच बॅटरी वाचवण्याचा पर्याय हा केवळ अँड्राइड ९ आणि वरील डिव्हाइससाठीच उपलब्ध असणार आहे.  फोनची बॅटरी  पुरेशी नसेल तेव्हा या 'डार्क मोड' फीचरमुळे हे अ‍ॅप अधिक गडद दिसेन यामुळे फोनची बॅटरी वाचेल.  

त्याचप्रमाणे संपूर्ण अ‍ॅपसाठी  दोन थीम  निवडण्याचा पर्यायही युर्जनां देण्यात आला आहे. यात लाइट थीम आणि डार्क थीम असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. डार्क थीमवर क्लीक केल्यानंतर अ‍ॅपचं बॅकग्राऊंड गडद करड्या रंगाचं होणार आहे तर लाइट थीमवर क्लीक केल्यानंतर  फिकट करड्या रंगात बॅकग्राऊंड पाहायला  मिळणार आहे. 

व्हॉट्सऍपकडून लवकरच नवी सुविधा... मेसेज ठराविक वेळेने होणार गायब