पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इन्स्टाग्रामचे ते फीचर व्हॉट्स अ‍ॅपमध्येही

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप आहे,  म्हणूनच हे अ‍ॅप वापरणाऱ्या ग्राहकांना अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न व्हॉट्स अ‍ॅपचा आहे. व्हॉट्स अ‍ॅप सध्या इन्स्टाग्राममध्ये असलेल्या बुमरँग फीचरवर काम करत आहे. हे फीचर लवकरात लवकर ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा व्हॉट्स अ‍ॅपचा प्रयत्न असणार आहे. 

सर्वाधिक पाठवण्यात येणाऱ्या व्हॉट्स अ‍ॅप मेसेजवर आता 'frequently forwarded' चा ठपका

या फीचरमुळे व्हॉट्स अ‍ॅप युजर्स ७ सेकंदाच बुमरँग व्हिडिओ तयार करता येणार आहे. व्हॉट्स अ‍ॅप कॅमेरामध्ये कोपऱ्यात बुमरँग हा पर्याय युजर्सनां देण्यात येणार आहे अशी माहिती व्हॉट्स अ‍ॅप बिटा इन्फोनं दिली आहे.

सॅमसंग ‘Galaxy Fold’ या दिवशी होणार लाँच 

हे बुमरँग व्हिडीओ युजर्सनां स्टेटसमध्ये ठेवता येणार आहेत त्याचबरोबर ते  व्हिडीओ शेअरही करता येणार आहेत.