पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डीलीट केलेल्या व्हॉट्स अ‍ॅप मेसेजचा आता मागमूसही राहणार नाही

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅपनं वर्षभरापूर्वी  ‘Delete for Everyone’ हे फीचर आणलं होतं. या फीचरचा फायदा जगभरातील व्हॉट्स अ‍ॅप युजर्सनां झाला. या फीचरमुळे अनावधानानं पाठवलेले मेसेड डीलीट करता आले. मात्र या फीचरचा दुसरा तोटा असा होता की युजर्सनं आपले चुकून पाठवलेले मेसेज डीलीट केल्यानंतर “This message has been deleted” असा संदेश स्क्रीनवर दिसायचा. त्यामुळे काहीतरी डीलीट केल्याचा पुरावा मागे राहायचाच. आता या समस्येवरही कंपनीनं तोडगा शोधून काढला आहे.  

सवलतीच्या काळात एका सेकंदाला शाओमीच्या १० हँडसेटची विक्री

कंपनीनं लवकरच ‘Disappearing Messages’ हे फीचर आणणार आहे. सध्या या फीचरवर काम सुरू आहे. यामुळे युजर्सनां चुकून  पाठवलेले मेसेज डीलीट करता येणार आहेत पण त्याचबरोबर त्याचा पुरावाही नष्ट करता येणार आहे. ‘Disappearing Messages’  या फीचरमुळे मेसेज डीलीट केल्यानंतर  “This message has been deleted” असा संदेश स्क्रीनवर दिसणार नाही. प्रथम ग्रुप चॅटसाठी हा पर्याय उपलब्ध  होईल असं म्हटलं जात आहे. 

सॅमसंगचा ‘Galaxy Fold’ भारतातला सर्वाधिक महागडा स्मार्टफोन