पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॉट्स अ‍ॅपसाठी Fingerprint Sensor !

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅप लवकरच बहुप्रतिक्षीत असं फिंगरफ्रिंट सेन्सॉर आणणार आहे. व्हॉट्स अ‍ॅप मेसेज इतरांनी पाहू नये यासाठी अनेक युजर्स सध्या थर्ड पार्टी अ‍ॅप वापरत आहे. या अ‍ॅपचा वापर करून पॅटर्न किंवा पिन वापरून व्हॉट्स अ‍ॅप लॉक करता येतं. मात्र व्हॉट्स अ‍ॅप अधिक सुरक्षित व्हावं यासाठी व्हॉट्स अ‍ॅप फिंगर प्रिंट सेन्सॉर आणणार आहे. 

सर्वाधिक पाठवण्यात येणाऱ्या व्हॉट्स अ‍ॅप मेसेजवर आता 'frequently forwarded' चा ठपका

यामुळे व्हॉट्स अ‍ॅप अधिक सुरक्षित राहिन असा कंपनीचा दावा आहे. फिंगर प्रिंट सेन्सॉरमुळे व्हॉट्स अ‍ॅप वापरकर्त्यांच्या फिंगरप्रिंटशिवाय ते कोणालाही उघडता येणार नाही. हे फिचर आयओएस (iOS) वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. आता ते अँड्राइड युजर्सनांही उपलब्ध होणार आहे. 
व्हॉट्स अ‍ॅप लॉक असतानाही नोटिफिकेशन्सद्वारे रिप्लाय किंवा कॉल रिसिव्ह करता येईल. याचबरोबर व्हॉट्स अॅप इन्स्टाग्राममध्ये असलेल्या बुमरँग फीचरवरही  काम करत आहे. या फीचरमुळे व्हॉट्स अ‍ॅप युजर्सनां ७ सेकंदाचा बुमरँग व्हिडिओ तयार करता येणार आहे. व्हॉट्स अ‍ॅप कॅमेरामध्ये कोपऱ्यात बुमरँग हा पर्याय युजर्सनां देण्यात येणार आहे अशी माहिती व्हॉट्स अ‍ॅप बिटा इन्फोनं दिली आहे. 

रस्त्यात सापडलेलं पैशांचं पाकीट लोक खरंच परत करतात का?

हे बुमरँग व्हिडीओ युजर्सनां स्टेटसमध्ये ठेवता येणार आहेत त्याचबरोबर ते  व्हिडीओ शेअरही करता येणार आहेत.