पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लग्न ठरलंय, हे आहेत वेडिंग मेकअपचे २०२० मधले खास ट्रेंड

वेडिंग मेकअप ट्रेंड २०२०

लग्न ही प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट असते. या लग्नात आपण सर्वांत सुंदर अगदी राजकुमारीसारखं दिसावं ही प्रत्येक मुलीची इच्छा असते. याची तयारी ती कित्येक महिने आधीपासून करत असते हे नक्की.  लग्नात खास दिसायचं आहे तर मेकअपही तितकाच महत्त्वाचा आहे, चला तर पाहू या वर्षी वेडिंग मेकअपमधले काही खास ट्रेंड

मराठी सेलिब्रिटींचे हे हटके साडी ट्रेंड तुम्ही नक्की ट्राय करा

कमीत कमी मेकअप 
यावर्षी कमीत कमी मेकअपचा ट्रेंड आहे. कमी मेकअप आणि  नैसर्गिक सौंदर्याला अधिक प्राधान्य असा  वेडिंग मेकअपचा नवा ट्रेंड रुजू होत आहे. लाइट फाऊंडेशन बेस, ग्लॉसी लिप्स आणि ब्लश असा मिनिमल मेकअप चर्चेत आहे. 

नो मेकअप
 

आय मेकअपचे २०२० मधले हे आहेत नवे ट्रेंड्स

नॅचरल हेअर
जास्त हेअर स्प्रेचा मारा करून करण्यात आलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या हेअरस्टाइलचा ट्रेंड मागे पडला आहे. सध्या मेसी आणि तितकीच नॅचरल वाटणारी हेअरस्टाइल चर्चेत आहे. वेव्ह किंवा कर्ल बनचा ट्रेंड तुम्ही ट्राय करू शकता. 

नॅचरल हेअर

मेटालिक/व्हाइट- निऑन आयलाइनर
ब्राऊन, ब्लू, ब्लॅक आयलाइनर शेड्सनंतर आता अधिक बोल्ड अशा व्हाइट- निऑन आयलाइनरचा ट्रेंड आला आहे. हे आयलायनर अधिक उठवदारही दिसतात. या वेडिंग सिझनसाठी सिल्व्हर, गोल्डन, रोझ पिंक अशा नव्या रंगाचा वापरही तुम्ही करु शकता. 

व्हाइट- निऑन आयलाइनर

व्हाइन लिप्स
न्यूड किंवा मॅट लिपस्टिकला छेद देत सध्या व्हाइन लिप्स ट्रेंड चर्चेत आहे. व्हाइन शेडमधले हे लिप्स कलर उठून दिसतात. 

व्हाइन लिप्स