पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाची लक्षणे आढळल्यास काय करावे?, रुग्णालयात जावे की घरी थांबावे?

कोरोना

कोरोनाबाबत जनतेच्या मनात भीती आणि काही गैरसमज आहेत. त्यामुळे याबाबत जनतेला योग्य ती माहिती मिळणे आणि शिक्षण होणे गरजेचे आहे असं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयानं जनजागृती मोहीम राबवली आहे. 

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांचा  आकडा सध्या ४२ वर आहे.  कोरोनाची लक्षणं आढळल्यास सर्वप्रथम काय करावं?  रुग्णालयात जावं की घरी राहावं? कोणत्या रुग्णालयात जावं? असे अनेक संभ्रम लोकांच्या मनात आहेत त्यामुळे नेमकं काय करावं ते पाहू 

कोरोना इफेक्ट : शेअर बाजारात मोठी पडझड

कोणी कोरोनाची तपासणी करणं आवश्यक आहे?
देशात आतापर्यंत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे ते रुग्ण परदेशात प्रवास करुन भारतात आले आहेत किंवा कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही परदेशातून प्रवास करून आलात किंवा अशा  व्यक्तींच्या संपर्कात आलात आणि तुमच्यामध्ये सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची प्रमुख लक्षणं आढळली असतील तर त्वरीत तपासणी करा. कोरोनाची चाचणी केल्यानंतर १४ दिवस त्या व्यक्तीस देखरेखीखाली ठेवले जाते.

कोरोनाची लक्षणे काय?
ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, कफ, छातीत दुखणे, सर्दी, डोकेदुखी,  थकवा जाणवणे, न्यूमोनिया ही काही  कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. 

... या कारणांमुळे ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस सोडली

कोणत्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात उपचार घ्यावेत? 
आरोग्य मंत्रालयानं  प्रत्येक राज्यासाठी हेल्पलाइन क्रमांक पुरवले  आहेत. विशेष म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन करताना सुरु होणाऱ्या सुचनांच्या शेवटी हा हेल्पलाइन क्रमांक ऐकू येतो. या हेल्पलाइन क्रमांकवर फोन केल्यास तुम्हाला कोरोनाच्या चाचणी आणि उपचारांसंदर्भात मदत प्राप्त होईल. त्याचप्रमाणे पुण्यात नायडू आणि मुंबईत कस्तूरबा रुग्णालयात उपचारांसाठी स्वतंत्र्य कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

कोरोनामुळे घाबरून जाण्याची गरज नाही !
कोरोनामुळे घाबरून जाण्याची गरज नाही मात्र प्रत्येकानं सतर्क राहून खबरदारी जरूर घेतली पाहिजे. जर डिसेंबर ते मार्च या काळात तुम्ही किंवा तुमच्या संपर्कातील व्यक्ती चीन, इटली, कोरिया, इराण किंवा  अन्य मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित देशातून परतली असेल आणि काही दिवसांत त्यामध्ये वरील लक्षणं आढळू लागली तर त्वरित हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून उपचार घ्या. 

कोरोनाग्रस्तांना शोधण्यासाठी म.रे.चा उपक्रम, २०० जणांना प्रशिक्षण

काय खबरदारी घ्याल
- साबण, पाणी किंवा हँड सॅनिटायझरनं हात स्वच्छ धूवा 
- खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल किंवा टिश्यू धरा
- टिश्यू वापरला असेल तर तो लगेच फेकून द्या , हात स्वच्छ धुवा
-हात स्वच्छ न धुता डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे टाळा
-आजारी व्यक्तींच्या संपर्कात जाणं टाळा.

घरी थांबा !
परदेशातून परतला नसाल किंवा अशा व्यक्तींच्या संपर्कातही तुम्ही आला नसाल मात्र वरील लक्षणं तुमच्यामध्ये आढळली असतील तर अशा व्यक्तींना आरोग्य मंत्रालयानं घरी थांबण्याची सूचना केली असेल.  ताप किंवा ही लक्षणं कमी झाली तर घाबरण्याची आवश्यकता नाही अन्यथा उपचार घेणं गरजेचं आहे. 

हॉलिवूड अभिनेते टॉम हँक्स आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण