पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Recipe : घरच्या घरी तयार करा स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री

स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री

असं म्हणतात कोणत्याही व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा रस्ता  पोटातून जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही स्वत: तयार केलेला  छान, चविष्ठ पदार्थ समोरच्या व्यक्तीचं मन सहज जिंकू शकतं. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेला तुम्हाला थोडीशी मेहनत घेऊन आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काही वेगळं तयार करायचं असेल तर स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री हा पर्याय तुम्ही ट्राय करु शकता.  फोर पॉइंट्स शेरेटनचे कार्यकारी शेफ मेराजुद्दीन अन्सारी यांनी त्यांची खास रेसिपी शेअर केली आहे ती नक्कीच तुम्हाला आवडेल.

केकसाठी
१ कप अन सॉलल्टेड बटर (मीठ नसलेला)
२ कप पीठी साखर
३ कप केकचे पीठ, चाळलेले
१ चमचा बेकिंग पावडर
अर्धा चमचा मीठ
सव्वा कप दूध
चार अंडी
२ चमचे व्हॅनिला अर्क

पहिल्या लेअरसाठी
तुकडे केलेल्या ताज्या स्ट्रॉबेरीज 
२ चमचे पीठी साखर
१ चमचा व्हॅनिला अर्क 

दुसऱ्या लेअरसाठी
२ कप हेवी व्हिपिंग क्रीम
१ चमचा व्हॅनिला अर्क
पाव कप साखर

कृती 
-    केक बनवण्यासाठी ओव्हन 350 अंशांवर प्रीहीट करा. केकसाठी आठ किंवा नऊ इंचीच्या गोलाकार भांड्याला पार्चमेंट कागद लावून घ्या. केक चिकटू नये यासाठी पार्चमेंट कागदावर थोडासा बटर आणि पीठ लावा.
-     एका भांड्यात बटर, साखर सर्वाधिक वेगाने फिकट आणि क्रीमी होईपर्यंत तीन ते चार मिनिटे फेटून घ्या. 
-    मध्यम आकाराच्या भांड्यात केकचे पीठ, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करा. दुसऱ्या भांड्यात दूध, अंडी, व्हॅनिला अर्क एकत्र व्हिस्क करा. पिठाचे मिश्रण बटरच्या मिश्रणात 3 अडिशन्सह घाला. एकाआड एक दुधाचे मिश्रण आणि अखेरीस पिठाचे मिश्रण असा क्रम ठेवा. प्रत्यकवेळएस भर घालताना भांड्याच्या कडांना लागलेले मिश्रण काढून घ्या. 

-    हे मिश्रण आधी तयार केलेल्या केकसाठीच्या दोन भांड्यात विभागून काढा आणि वरचा भाग खरपूस सोनेरी होईपर्यंत आणि हलका स्पर्श केल्यानंतर वर येईपर्यंत म्हणजे किमान 30 ते 35 मिनिटे बेक करा. केक बाहेर काढून थंड करा नंतर  केक फ्रिजमध्ये ठेवून थंड करून घ्या.
-    केक सर्व्ह करताना कापलेल्या स्ट्रॉबेरीज, साखर आणि व्हॅनिला अर्क एका भांड्यात एकत्र करून 20 मिनिटे तसेच ठेवून द्या.
-    व्हिप्ड क्रीम तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक मिक्सरने व्हिपिंग क्रीम, साखर, व्हॅनिला अर्क मध्यम आकाराचे पिक्स तयार होईपर्यंत फेटा. 
-    थंड केलेले केकचे लेयर्स फ्रीजमधऊन काढा आणि लहान सुरीने प्रत्येक लेयरला आडवा छेद द्या. त्यानंतर करवतीप्रमाणे आरे असलेल्या मोठ्या सुरीने प्रत्येक लेयर आधी दिलेल्या छेदावरून कापून घ्या.
- केक प्लेटवर किंवा स्टँडवर केकचा एक लेयर ठेवा. एक कप व्हिप्ड क्रीमचा थर आणि स्ट्रॉबेरी मिश्रणाचा पाव भाग त्यावर लावा. केकचे बाकीचे लेयर्स, व्हिप्ड क्रीम आणि स्ट्रॉबेरीजसाठी या कृतीची पुनरावृत्ती करा. 
- केक लगेच सर्व्ह करा.