पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Recipe : सोप्या पद्धतीनं तयार करा रिच चॉकलेट स्ट्रॉबेरी ब्राउनी

रिच चॉकलेट स्ट्रॉबेरी ब्राउनी

व्हॅलेंटाइन डेला विकत आणून गिफ्ट देणं वेगळं अन् आपल्या हातान् तयार केलेलं गिफ्ट प्रियकर- प्रेयसीला  देणं वेगळं. या मेहनतीत खरी मज्जा आहे. त्यामुळे या खास दिवशी तुम्ही घरच्या घरी काही स्पेशल करण्याचा बेत करत असाल तर रिच चॉकलेट स्ट्रॉबेरी ब्राउनी घरी तयार करुन पहायला  हरकत नाही. फोर पॉइंट्स शेरेटनचे कार्यकारी शेफ मेराजुद्दीन अन्सारी यांनी त्यांची खास रेसिपी शेअर केली आहे ती नक्कीच तुम्हाला आवडेल.

साहित्य 
२ मोठी अंडी
दोन तृतीयांश कप  कोको पावडर
अर्धा चमचा मीठ
अर्धा चमचा बेकिंग पावडर
१ चमचा व्हॅनिला किंवा कॉफी अर्क
अर्धा कप मीठ नसलेले बटर
१ कप साखर
पाउण कप मैदा
१ मिल्क चॉकलेट बार
१ डार्क चॉकलेट बार
७ ते ८ स्ट्रॉबेरीजचे काप

कृती 

-    ओव्हन ३५० फॅरेनहाइटवर प्रीहीट करा एका चौकोनी ट्रेला पार्चमेंट कागद लावून घ्या. 
-    बटर आणि साखर एकत्र करा आणि ३० सेकंदाच्या अंतराने बटर आणि साखर वितळेपर्यंत मंद आचेवर हे मिश्रण एकजीव करा.
-    त्यात अंडी, बेकिंग पावडर, मीठ आणि व्हॅनिला किंवा कॉफी अर्क घाला.
-    त्यानंतर कोको पावडर आणि मैदा घाला आणि मिश्रण एकजीव करा. या मिश्रणात गुठळ्या राहू देऊ नका.
-    अखेर कापलेले चॉकलेट बार यात टाका.
-     कापलेल्या स्ट्रॉबेरीजदेखील ब्राउनी मिश्रणात टाका आणि २० ते २५ मिनिटे, त्यात घातलेली टुथपिक काही, मऊशार कणांसह बाहेर येईपर्यंत बेक करा.
-     सर्व्ह करण्यापूर्वी थोडे थंड करा किंवा थंडगार सर्व्ह करा