पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हॅलेंटाइन डेला 'मन की बात' बोलण्याआधी...

व्हॅलेंटाइन डे

व्हॅलेंटाइन डे म्हणजे तमाम प्रेम करणाऱ्या तरूण- तरूणींचा आवडता दिवस. तसेच आवडत्या व्यक्तीजवळ 'मन की बात' बोलण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस तो कोणता. कारण यादिवशी सहसा प्रेमाची  कबुली देणाऱ्या व्यक्तीचं मन मोडलं जात नाही. मात्र तुम्हालाही  मन की बात बोलण्याआधी थोडसं दडपण आलंय किंवा ती कशी बोलायची असा प्रश्न तुम्हाला  पडला असेल तर या महत्त्वाच्या टीप्स नक्कीच तुमच्या कामी येऊ शकतात. 

- मनातली ती गोष्ट बोलण्याआधी तुमच्या आवडत्या व्यक्तीला छानशी भेट दिली तर? तुमचं अर्ध्याहून अधिक काम सोप्पं होईल. प्रिय व्यक्तीच्या अनेक आवडी- निवडी तुम्हाला चांगल्याच ठावूक असतील. त्यामुळे अशा गोष्टींची  यादी तयार करा. प्रपोज करण्याआधी त्या यादीतील आवडती गोष्ट नक्कीच भेट म्हणून सोबत न्या, ग्रिटींग, टेडी किंवा फुलं देण्यापेक्षा हा फंडा नक्कीच कामी येतो. 

- 'मन की बात' बोलण्यासाठी एखादी स्पेशल जागा आधीच ठरवा. कॉफी शॉप किंवा रेस्तराँ हा पर्याय नंतर ठेवा, मात्र अशी जागा निवडा जिथे तुम्हा दोघांच्या भरपूर आणि चांगल्या आठवणी असतील. अशा ठिकाणी प्रेमाची कबुली देण्यासारखं सुख नाही.

- जर अशा ठिकाणी जाणं शक्य नसेल तर तुम्ही कॉफी शॉप किंवा रेस्तराँचा पर्याय निवडू शकता, कारण व्हॅलेंटाइन डेसाठी ही शॉप्स किंवा रेस्तराँ विशेष सजवण्यात आलेली  असतात. तिथे बरेच  कार्यक्रमही असतात त्यामुळे ही ट्रीट तुम्ही आवडत्या व्यक्तीला देऊ शकतात. 

- तुम्हाला त्या व्यक्तीसमोर बोलता येत नसेल तर तुम्ही एखादं छान प्रेमपत्रही लिहू शकता. आता अनेकांसाठी हे फारच ओल्डफॅशन वाटेल, तंत्रज्ञानाच्या युगात कोण हातानं पत्रं लिहितं असं अनेकांना वाटेल. मात्र जुने फंडे हे नेहमीच कामी येतात, आणि समोरच्या व्यक्तीला ते अनपेक्षीत देखील असतं. म्हणूनच  मनात सुरु असलेल्या असंख्य भावना व्यक्त करायचा असतील तर शब्दांशिवाय दुसरा सखा तो  कोणता?