पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महागड्या क्रिमला विसरा! ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने त्वचा होते चमकदार

चमकदार त्वचा

सुंदर दिसण्यासाठी आणि चेहरा चमकदार बनवण्यासाठी आपण बऱ्याचदा महागड्या क्रिमचा वापर करतो. अशा क्रिमचा वापर करेपर्यंत तुमचा चेहरा चांगला दिसतो. मात्र क्रिमचा वापर थांबवल्यानंतर तुमचा चेहरा पुन्हा निस्तेज दिसू लागतो. जर तुमच्यासोबत असे घडले असेल तर तुम्हाला अशा क्रिमची नाही अशा फळ आणि भाज्यांची आवश्यकता आहे. ज्या तुमचा चेहरा नैसर्गिकरित्या चमकदार आणि निरोगी बनवू शकतो. त्यासाठी हे जरूर वाचा. 

पाण्यामध्ये उगवणाऱ्या भाज्या - 
पाण्यामध्ये उगवणाऱ्या भाज्या खाल्ल्याने त्वचेला अनेक चांगले फायदे होतात. या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स, न्यूट्रिशस, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरेस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी १ आणि बी २ असते. या भाज्यांमध्ये कमळ काकडी, सिंघाडा, अरबी या भाज्यांचा समावेश होतो.

पालक - 
तुम्हाला पालक आवडत असो वा नसो. मात्र पालक खाण्याचे अनेक फायदे आहेत. पालकची भाजी आवडत नसेल तर पालकचे सूप करुन प्या. तसंच, पालक पनीर बनवून तुम्ही खाऊ शकता. 

ब्ल्यू बेरीज -
ब्ल्यू बेरीमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी तसेच एंथोसायनिन नावाचे एंटी-एजिंग एंटीऑक्सीडेंट असतात. ते त्वचेला नुकसान पोहचवणारे फ्री रॅडिकल्स बाहेर काढण्यास मदत करतात.
 
शिमला मिर्ची - 
शिमला मिर्चीमध्ये कॅरोटीनोईड्स तसेच व्हिटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात. जे एंटी-एजिंगला मदत करतात. शिमला मिर्ची खाल्ल्याने जे त्वचा निरोगी राहते. 

ब्रोकली -
ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन सी, के, फायबर, फोलेट आणि कॅल्शियमचे प्रमाण असते. हे घटक कोलेजनचे प्रमाण वाढवतात आणि त्वचेला मऊ तसेच चमकदार बनवातात. ब्रोकली कच्चे किंवा वाफवून सुध्दा खाऊ शकता.