पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अँड्राईडसाठी व्हॉट्स अ‍ॅप आणणार हे नवे फीचर्स

व्हॉट्स अ‍ॅप

व्हॉट्स अ‍ॅप अँड्राईड फोनधारकांसाठी काही  नवे फीचर्स घेऊन येत आहे. अँड्राईड धारकांसाठी  व्हॉट्स अ‍ॅप वापरणं अधिक सुलभ व्हावं यासाठी व्हॉट्स अ‍ॅप काही महत्त्वाचे फीचर आणणार आहे. हे फीचर कोणते ते पाहू. 
Payment
व्हॉट्स अ‍ॅप पुढील वर्षी आपलं बहुप्रतिक्षित पेमेंट  फीचर लाँच करणार आहे. या फीचरमुळे युजर्सनां व्यवहार करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने भारतात मागीलवर्षीपासूनच यूपीआय आधारित पेमेंटचे परीक्षण करण्यास सुरुवात केली आहे.
Dark Mode
गेल्या कित्येक दिवसांपासून या फीचर्सची चर्चा आहे. या फीचरमुळे डोळ्यांना होणारा त्रास कमी होणार आहे. सूर्यास्तानंतर फोनमधल्या ब्राइट लाइटमुळे डोळ्यांना त्रास होतो म्हणूनच युजर्सच्या सोयीसाठी व्हॉट्स अ‍ॅप लवकरच डार्क मोड हे फीचर आणणार आहे.
Boomerang
व्हॉट्स अ‍ॅप सध्या इन्स्टाग्राममध्ये असलेल्या बुमरँग फीचरवर काम करत आहे. हे फीचर लवकरात लवकर ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा व्हॉट्स अ‍ॅपचा प्रयत्न असणार आहे. या फीचरमुळे व्हॉट्स अ‍ॅप युजर्स ७ सेकंदाच बुमरँग व्हिडिओ तयार करता येणार आहे. व्हॉट्स अ‍ॅप कॅमेरामध्ये कोपऱ्यात बुमरँग हा पर्याय युजर्सनां देण्यात येणार आहे अशी माहिती व्हॉट्स अ‍ॅप बिटा इन्फोनं दिली आहे.
Multi-platform support
सध्या व्हॉट्स अ‍ॅप हे एकावेळी मोबाईलमध्येच वापरता  येतं मात्र आता ते विविध प्लॅटफॉर्मवर वापरता येईल का याची चाचणी कंपनी करत आहे.