भारताचा सर्वात मोठा नकाशा तयार करून लिम्का बुकमध्ये नाव नोंदवण्याचा प्रयत्न फेविक्रिलनं केला आहे. फेविक्रिल या ब्रँडनं 'ऑल कॅन आर्ट' हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमाअंतर्गत भारताचा सर्वात मोठा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न केला गेला.
'खतरो के खिलाडी'मध्ये जाण्यापूर्वी आईचा अमृताला हा मोलाचा सल्ला
फ्लुइड आर्ट तंत्राद्वारे कॅनव्हसवर अनेकांनी पेटिंग केली. सर्वसाधारणपणे रंग व चित्रकला यांच्याविषयी तांत्रिक माहिती नसल्याने लोक कॅनव्हासवर आपली कल्पना मांडण्यास टाळाटाळ करतात मात्र फ्लुइड आर्ट तंत्राद्वारे अनेकांना पेटिंग करण्याची संधी मिळाली.
या पेटिंग्सचा वापर करून नकाशा तयार करण्यात आला. या नकाशाची लांबी २५ फूट व रूंदी २५ फूट आहे. पार्किन्सन्सचे ९७ रुग्ण, ३००+ शालेय विद्यार्थी व ६८ कॉर्पोरेट कर्मचारी यांनी तयार केलेल्या सर्जनशील कलाकृती एकत्र करून हा नकाशा तयार करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर, सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल येथे या अप्रतिम कलाकृतीचे अनावरण करण्यात आले. १८ ऑगस्टपर्यंत सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल येथे ही कलाकृती पाहता येणार आहे.