पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्विटरवर सहा महिन्यांपासून अ‍ॅक्टिव्ह नाही, मग हे वाचाच

ट्विटर

सहा महिन्यांपासून अ‍ॅक्टिव्ह नसलेली ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे.  ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. अनेक गोष्टी  इथे चटकन समजतात.  राजकीय नेते, सेलिब्रिटी, खेळाडू सगळेच मोठ्या प्रमाणात ट्विटरवर सक्रिय आहेत. एखाद्या युजरनं अकाऊंट सुरु केलंय मात्र सहा महिन्यांपासून तो ट्विटरवर अ‍ॅक्टिव्ह नसेल तर त्यांचं अकाऊंट कंपनीकडून बंद करण्यात येणार आहे. 

व्हॉट्सऍपकडून लवकरच नवी सुविधा... मेसेज ठराविक वेळेने होणार गायब

कार्यरत नसलेल्या अकाऊंट युजर्सनां ट्विटरकडून मेल पाठवण्यात येणार आहे. अशा युजर्सनां ११ डिसेंबर आधी ट्विटरवर सक्रिय होण्यात सांगण्यात येणार आहे. मात्र त्यानंतरही कार्यरत नसणारी अकाऊंट कंपनीकडून काही महिन्यांत बंद करण्यात येणार आहेत. 

ट्विटरवर राजकीय जाहिराती आजपासून बंद

 आम्ही कार्यरत नसलेली अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरची विश्वासार्हत वाढावी, लोकांनी यावर अधिक सक्रिय व्हावं यासाठी  हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्विटरच्या प्रवक्तांनी सांगितलं आहे. यापूर्वी २०१३ मध्ये  याहूनं  १२ महिन्यांपासून वापरात नसलेले याहूआयडी बंद केले होते.